शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लॉकडाउनमुळे इंग्लंड, जर्मनीसह 'या' बड्या देशांतील लोक भडकले अन् थेट रस्त्यावर उतरले!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 24, 2020 10:25 PM

1 / 9
जीवघेणा कोरोना व्हायरस पुन्हा एकदा वेगाने पसरायला सुरुवात झाली आहे. भारतासह संपूर्ण जगात कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. यापासून आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी अनेक देशांनी पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. मात्र तेथील जनता आपल्या सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध करत थेट रस्त्यावर उतरली आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटनाही घडल्या.
2 / 9
इंग्लंडमध्ये पोलीस आणि नागरिक भिडले - लॉकडाउनमुळे अनेकांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेकांना त्यांचे स्वातंत्र्य हिरावल्या सारखे वाटत आहे. संक्रमण वाढण्याची भीती असतानाच दुसऱ्या लॉकडाउनदरम्यानच इंग्लंडमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आणि सरकारच्या या निर्णयाचा विरोध करू लागले.
3 / 9
यावेळी इंग्लंडमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेबरोबरच निदर्शकांचा जमाव आणि पोलीसांत झटापट झाली. इंग्लंडमधील दुसरा लॉकडाउन संपन्यासाठी अद्याप दोन आठवड्यांहून अधिकचा कालावधी बाकी आहे.
4 / 9
जर्मनीतही लोक रस्त्यावर - सरकारच्या लॉकडाउन करण्याच्या निर्णयाविरोध जर्मनीमध्येही लोक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी सरकारकडे लॉकडाउन हटविण्याची मागणीही केली. यावेळी सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांची चकमकही उडाली.
5 / 9
जर्मनित रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत मास्कदेखील काढून फेकले. येथील परराष्ट्रमंत्री Heiko Maas यांनी या निदर्शकांची तुलना नाझींशी केली आहे.
6 / 9
युरोपातील अनेक शहरांत लोकांचा लॉकडाउनला विरोध - कोरोना संक्रमणाचा वाढता वेग पाहता, ऑस्ट्रिया, बेल्जिअम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि स्पेन सारख्या यूरोपीयन देशांनी पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता...
7 / 9
...मात्र सरकारचा हा निर्णय तेथील लोकांना पटला नाही. येथील व्यवसायिक आणि मजूर आपल्या भविष्यासंदर्भात चिंतित आहेत.
8 / 9
युरोपियन युनियनमधील देश असलेल्या इटलीसाठी हे वर्ष अत्यंत वाईट ठरले. येथे लॉकडाउनच्या निर्णयाविरोधात एक आठवड्याहून अधिक काळ हिंसक निदर्शने झाली.
9 / 9
येथिल लोक, सरकारच्या चित्रपटगृहे, थिएटर्स आणि रेस्टॉरंट बंद करण्याच्या निर्णयाविरोधात होते. जर्मनी, फ्रान्स सारख्या देशांतही लकडाउनमुळे सुस्त झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे लोक भयभीत झाले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसEnglandइंग्लंडGermanyजर्मनीItalyइटलीFranceफ्रान्स