1 / 8गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे लोकांसाठी सामान्य झाले आहे. सरकारपासून ते सेलेब्रिटीपर्यंत प्रत्येकजण लोकांना सोशल डिस्टंसिंग आणि मास्क घालण्याचे आवाहन करीत आहे. 2 / 8मात्र, अमेरिकेतील असे एक रेस्टॉरंट आहे, जिथे मास्क घातल्यास लोकांना दंड आकारला जातो. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरात फिडलहेड्स कॅफे आहे, जे आपल्या नियमांमुळे खूपच चर्चेत आहे. या कॅफेचे मालक ख्रिस कासलमॅन आहेत. 3 / 8ख्रिस हे नेहमीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांना विरोध करत आहेत आणि ते कोरोना लसीचे समर्थक सुद्धा नाहीत. लॉकडाऊनमुळे अमेरिकेला खूप त्रास सहन करावा लागला आहे, असा ख्रिस कासलमॅन यांचे म्हणणे आहे.4 / 8विशेष म्हणजे अमेरिकेत कॅलिफोर्निया आणि हवाई ही अशी राज्ये आहेत, जिथे लसीकरण केल्यानंतरही लोकांना घरांमध्ये मास्क लावावे लागत आहे. मात्र, ख्रिस हे त्याच्या रेस्टॉरंटमध्ये मास्क लावलेले लोक पाहू इच्छित नाहीत. त्यांच्या रेस्टॉरंटचा पहिला नियम असा आहे की, जर कोणतीही व्यक्ती मास्क लावून आली तर त्या व्यक्तीला 5 डॉलर दंड आकारला जाईल.5 / 8याचबरोबर, या रेस्टॉरंटचा आणखी एक नियम असा आहे की, जर एखादी व्यक्ती कोरोना लसीची प्रशंसा करताना दिसली तर त्या व्यक्तीला 5 डॉलर्स इतका दंड आकारण्यात येईल. मात्र, या दंडाविषयी बोलताना ख्रिस यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, हा सर्व दंड स्थानिक धर्मादाय संस्थेकडे जाईल.6 / 8ख्रिस म्हणाले की, ज्यावेळी त्यांनी आपल्या रेस्टॉरंटच्या बाहेर यासंदर्भातील साइन बोर्ड लावला, त्यावेळी बरेच लोक ते पाहून परत जात होते. मात्र, दुसऱ्यांना लोकांना समजले की, या दंडाची रक्कम धर्मादाय संस्थेकडे जात आहे, तेव्हापासून लोक आमच्या रेस्टॉरंटमध्ये येतात. पुढील काही महिने हे नियम लागू राहतील असे ख्रिस यांनी सांगितले.7 / 8याआधीही ख्रिस आपल्या ब्लॉगमुळे चर्चेला आले होता. ते म्हणाले होते की, मी त्या सर्व लोकांचा आदर करतो जे स्वत: चे आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी धडपडत आहेत, परंतु कोरोनापासून स्वत: चे रक्षण करणे ही निरोगी जीवनाची ओळख नाही. अर्थव्यवस्था बंद आणि सोशल डिस्टंसिंग यामुळे लोकांची मानसिक स्थिती खालावली आहे.8 / 8याशिवाय, ख्रिस यांनी असेही लिहिले की, नैराश्य, गरिबी आणि इतर कारणांमुळे अमेरिकेत गेल्या अनेक वर्षांत आत्महत्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. मास्कविरोधी समर्थक असल्याने मला गोष्टी माझ्या स्वत: च्या मार्गाने हाताळायच्या आहेत. कदाचित माझी पद्धत इतरांपेक्षा वेगळी असेल परंतु यामुळे आम्ही गुन्हेगार बनत नाही.