Area, population, economy and military capability; Such is the strength of India and China BKP
क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल... By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 11:21 AM1 / 22आशिया खंडातील दोन बलाढ्य देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्वनावरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. लडाखमध्ये दोन्ही देशांचे लष्कर समोरासमोर- आले असून, काही ठिकाणी झटापटी झाल्याचेही वृत्त आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिलेले असल्याने वातावरण अधिकच गढूळ झाले आहे. भारताकडूनही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि चीन या दोन बलाढ्य देशांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था, शासन प्रणाली आणि सैन्यक्षमतेचा घेतलेला हा आढावा. 2 / 22क्षेत्रफळ - भारत आणि चीन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील मोठे देश आहेत. भारताचे क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार चौकिमी एवढे आहे. तर चीनचे क्षेत्रफळ ९५ लाख, ९६ हजार ९६० चौकिमी आहे. चीन भारतापेक्षा तीन पटीने मोठा आहे. 3 / 22किनारपट्टी - भारताला सात हजार ५१६ किमीचा किनारा लाभला आहे. तर चीनला १४ हजार ५०० किमी लांबीचा किनारा लाभला आहे. 4 / 22लोकसंख्या - भारत आणि चीनच्या लोकसंख्येमध्ये फारसे अंतर राहिलेले नाही. भारताची सध्याची लोकसंख्या १ अब्ज ३२ लाख आहे. तर चीनची लोकसंख्या १ अब्ज ३७ लाख एवढी आहे. 5 / 22आयुर्मान - भारतातील सरासरी आयुर्मान ६९.०९ वर्षे आहे. तर चीनचे सरासरी आयुर्मान ७५.७ वर्षे आहे. 6 / 22साक्षरता - भारताची साक्षरता ७४.०४ टक्के आहे. तर चीनमधील साक्षरतेचा दर ९१.६ टक्के आहे. 7 / 22शासन व्यवस्था - भारतामध्ये लोकशाही शासनव्यवस्था आहे. तर चीनमध्ये एकपक्षीय शासनव्यवस्था आहे. चीनमध्ये लोकशाही नाही. 8 / 22अर्थव्यवस्था - भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. तर चीनने सरकार नियंत्रित अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. 9 / 22जीडीपी - भारताचा जीडीपी दोन हजार २५६ अब्ज डॉलर आहे. तर चीनचा जीडीपी हा ११ हजार २१८ अब्ज डॉलर एवढा आहे.10 / 22दरडोई जीडीपी - भारताचा दरडोई जीडीपी हा सहा हजार ६१६ डॉलर एवढा आहे. तर चीनचा दरडोई जीडीपी हा १५ हजार ३९९ डॉलर एवढा आहे. 11 / 22दरडोई जीडीपी - भारताचा दरडोई जीडीपी हा सहा हजार ६१६ डॉलर एवढा आहे. तर चीनचा दरडोई जीडीपी हा १५ हजार ३९९ डॉलर एवढा आहे. 12 / 22निर्यात - भारताची एकूण निर्यात ४२३ अब्ज डॉलर एवढी आहे. तर चीनकडून होणारी निर्यात ही २ हजार ५६० एवढी आहे. 13 / 22आयात - भारताची आयात ५१६ अब्ज डॉलर आहे. तर चीनची आयात २१४८ अब्ज डॉलर एवढी आहे. 14 / 22सैन्यदल - भारताकडे १२ लाख सैनिकांचे लष्कर आहे. तर चीनच्या सैन्यदलात २३ लाख सैनिकांचा समावेश आहे. 15 / 22बंदरे - भारतात १२ मोठी आणि २०० छोटी बंदरे आहेत. तर चीनमध्ये १३० मोठी आणि २०० मध्यम आकाराची बंदरे आहेत. 16 / 22विमानतळ - भारतात १२६ नागरी प्रवासी विमानतळ आहेत. तर चीनमध्ये २२० हून अधिक नागरी विमानतळ आहेत. 17 / 22रेल्वे मार्ग - भारतात १ लाख १९ हजार ६३० किमी लांबीचे रेल्वेमार्ग आहेत. तर चीनमध्ये १ लाख २१ हजार किमी लांबीचे रेल्वेमार्ग आहेत. 18 / 22 देश सोडणाऱ्या नागरिकांची संख्या - भारतात दर दहा हजार लोकांमागे ४ जण दरवर्षी देश सोडतात. तर चीनमध्ये हेच प्रमाण ३ एवढे आहे. 19 / 22 सरकारी कर्ज - भारतात सरकारी कर्जाचे प्रमाण ४६ टक्के आहे. तर चीनमध्ये सरकारी कर्जाचे प्रमाण ४६ टक्के एवढे आहे. 20 / 22बेरोजगारी - भारतात तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण ९.८ टक्के आहे. तर चीनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १०,५ टक्के आहे. 21 / 22 ब्रॉडबँड कनेक्शन - भारतात प्रति १०० रहिवाशांमागे १.३ ब्रॉडबँड कनेक्शन आहेत. तर चीनमध्ये हेच प्रमाण १८.६ एवढे आहे. 22 / 22 आफ्रिकेतील गुंतवणूक - तुलनेने गरीब असलेल्या आफ्रिका खंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध देशांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. आफ्रिका खंडात भारताकडून १६.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. तर चीनने आफ्रिकेत ३४.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications