Artemis 1 Launch: NASA ready for 'Moon Landing', biggest rocket to launch tomorrow
Artemis 1 Launch: 'मून लँडिंग'साठी NASA तयार, उद्या होणार सर्वात मोठ्या रॉकेटचे उड्डाण... By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 9:35 PM1 / 5 NASA चे आजपर्यंतचे सर्वाधिक शक्तिशाली स्पेस रॉकेट अंतराळात जाण्यास सज्ज झाले आहे. नासा 50 वर्षानंतर मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे. 1972 नंतर पहिल्यांदाच माणसाचे पाय चंद्रावर पडणार आहेत. या योजनेसाठी नासा Artemis 1 मिशन अंतर्गत आपली पहिली टेस्ट फ्लाइट अंतराळात पाठवत आहे. हे स्पेसक्राफ्ट सोमवारी म्हणजेच उद्या फ्लोरिडा लॉन्चपॅडवरुन अंतराळाकडे उड्डाण घेईल. 2 / 5 Artemis 1, मिशनअंतर्गत ओरियन स्पेसक्राफ्ट (Orion Spacecraft)चंद्रावर पाठवले जाईल. या रॉकेटच्या सर्वात वरच्या बाजुला 6 अंतराळवीरांना बसण्यासाठी डीप-स्पेस एक्सप्लोरेशन कॅप्सूल आहे. याला 322 फूट लांब आणि 2,600 टन वजनाचा स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) मेगारॉकेटशी जोडलेले असेल. सोमवारी सकाळी 8.33 वाजता रॉकेटचे उड्डाण होईल. याला फ्लोरिडाच्या त्याच केप कॅनावेरल लॉन्च कॉम्प्लेक्स (Cape Canaveral launch complex) मधून लॉन्च केले जाईल, जिथून 1972 मध्ये लूनर मिशन (Apollo Lunar Mission) लॉन्च केले होते.3 / 5 मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी एक टेस्ट केली जाईल, ज्या अंतर्गत या रॉकेटमध्ये पुतळे बसवण्यात येणार आहेत. ओरियनमध्ये मानवाऐवजी पुतळे बसवले जातील. यातून नासा नेक्स्ट जेनेरेशन स्पेससूट आणि रेडिएशन लेव्हलचे मूल्यांकन होईल. पुतळ्यांसोबत स्नूपी सॉफ्ट टॉयदेखील असेल. हा कॅप्सूलच्या आत सर्व बाजुला फिरेल आणि झिरो ग्रॅव्हिटी इंडिकेटरप्रमाणे काम करेल. ओरियन चंद्राच्या भवताली 42 दिवसांचा प्रवास करेल.4 / 5 हे मिशन यशस्वी झाल्यानंतर 2025 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्या महिला अंतराळवीरासह दोघांना उतरवले जाईल. दुसरी टेस्ट फ्लाइट Artemis II, मे 2024 मध्ये होईल, ज्यातून 4 अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत जातील, पण चंद्रावर लँडिंग करणार नाहीत. नासाचे अधिकारी आणि स्पेस शटलचे माजी अॅस्ट्रोनॉट बिल नेल्सन म्हणाले की, या टेस्ट फ्लाइटद्वारे मिशन मॅनेजर रॉकेटची क्षमता तपासतील. ओरियन, अंतराळ स्टेशनवर डॉक न करता अनेक दिवस अंतराळात राहणारे पहिला स्पेसक्राफ्ट असेल. ऑक्टोबरमध्ये हा पृथ्वीवर परत येईल. चंद्रावर जाणे, तिथे 42 दिवस राहणे आणि पृथ्वीवर परत येणे, ही तब्बल 60,000 किलोमीटरची मोठी यात्रा असेल.5 / 5 या स्पेसक्राफ्टद्वारे नासाचे शास्त्र अनेक एक्सपेरिमेंट करतील. यात बायोएक्सपेरिमेंट -1, चार एक्पेरिमेंटचा एक सेट आहे, ज्यात माणसांना चंद्रावर आणि मंगळावर पाठवण्यापूर्वी होणारा रेडिएशनचा परिणाम चेक करेल. शास्त्रज्ञ या स्पेसक्राफ्टमधून लहान रोपटे, शेवाळ, फंगस पाठवणार असून, रेडिएशनचा यावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास केला जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications