शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Athos Salome Nostradamus: आधुनिक जगाचा नॉस्ट्रॅडॅमस! मस्क, एलिझाबेथ बाबत भविष्यवाणी खरी ठरली; १२ वर्षांचा असताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 2:01 PM

1 / 5
आपल्या सर्वांना नॉस्ट्रॅडॅमस माहितीच असेल, जगविख्यात भविष्यवेत्ता. या भविष्यवेत्त्याने शेकडो वर्षांपूर्वी अनेक गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, ज्या त्या त्या वेळेनुसार खऱ्या ठरत असल्याचा दावा केला जात आहे. असाच एक आधुनिक जगतातील भविष्यवेत्ता सापडला आहे. त्याला या काळातला नॉस्ट्रॅडॅमस म्हटले जातेय.
2 / 5
ब्राझीलच्या या तरुणाचे नाव एथोस सैलोमे आहे. एथोसचा दावा आहे की त्याने कोरोना महामारी, राणी एलिझाबेथचा मृत्यू, एलम मस्क ट्विटर खरेदीचा प्रयत्न आदींबाबत भविष्यवाणी केली होती. याचबरोबर मस्क यांनी नुकताच ज्या ह्युमनॉईड रोबोटला जगासमोर आणले, त्याचीही या तरुणाने भविष्यवाणी केली होती. याच भविष्यवेत्त्या तरुणाने तिसरे महायुद्ध सुरु झाल्याचे म्हटले आहे. २८ मार्च २०२१ ला एथोसने २०२२ चे भविष्य सांगितले होते. यामध्ये रोबोट मानवाची जागा घेईल असे म्हटले होते. राणी एलिझाबेथबाबतही लिहिले होते.
3 / 5
तिसरे महायुद्ध २०२२ मध्येच सुरु होणार असल्याचे या एथोसने म्हटले होते. रशियाने युक्रेनवर जेव्हा हल्ला केला तेव्हाच तिसरे महायुद्ध सुरु झाल्याचे त्याने म्हटले आहे. या एथोसचे विरोधकही आहेत. त्याला तुक्का मारणारा आणि भविष्यवेत्ता असल्याचे ढोंग रचणारा असल्याचे हे टीकाकार म्हणतात. यावरही एथोसची प्रतिक्रिया आहे.
4 / 5
मी स्वत:ला भविष्यवेत्ता मानत नाही. मी त्यावर विश्वासही ठेवत नाही. विज्ञान देखील माझ्या स्किलना मानत आहे. काही महिन्यांपूर्वी मी आणि मी बनविलेली यादी एका तांत्रिक विश्लेषनातून गेलो. यामध्ये कोणत्याही पद्धतीची काही ट्रिक असेल असे सापडले नाही, असे तो म्हणाला. १२ वर्षांचा असताना मला जाणवले की मी अन्य लोकांपेक्षा वेगळा आहे. ज्या घटनांवर माझे नियंत्रण नाही किंवा संबंध नाही त्यावर बोलणे मला खूप आवडायला लागले, असे तो म्हणाला.
5 / 5
कधी कधी मला त्यावर संशयही वाटू लागतो. त्या गोष्टी शक्यही वाटत नाहीत, पण काही वेळाने त्या खऱोखर घडतात. माझी ही ताकद ही मला देवाचा दिलेला आशिर्वाद आहे. म्हणतात ना प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचा अंश असतो, माझ्यात देखील अर्धा देव आहे, असे एथोसने म्हटले आहे. मला असे वाटतेय की मला जगातील लोकांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले आहे. मी लोक त्यांच्या आयुष्यात काय शोधत आहेत, ते देखील सांगू शकतो, असे एथोस म्हणतो. युक्रेनवरील हल्ल्याच्या ४४ दिवस आधीच मी याची माहिती दिली होती, असाही दावा त्याने केला.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया