शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेत बॉम्ब चक्रिवादळाचा हाहाकार, कॅलिफॉर्नियाची अवस्था अत्यंत दयनीय- पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 7:53 PM

1 / 11
वातावरणात अत्यंत वेगाने आणि तीव्र बदल झाल्याने कॅलिफॉर्नियात Bomb Cyclone चा धोका आहे. त्यातच Atmospheric River ची परिस्थिती निर्माण झाल्याने हाहाकार उडला आहे.
2 / 11
अमेरिकेतलं कॅलिफोर्निया ( California ) राज्य सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. Bomb Cyclone मुळे हाहाकार माजला आहे.
3 / 11
Bomb Cyclone म्हणजे वातावरणातल्या ठराविक रचनेमुळे निर्माण झालेली चक्रवाताची स्थिती. या वायुमंडलामुळे चक्रीवादळासारखं वातावरण आहे आणि जोरदार पाऊस सुरू आहे.
4 / 11
बॉम्बस्फोट जसा एकदम अचानक होतो आणि विद्ध्वंस करतो तसाच वातावरणाचा तडकाफडकी होणारा मोठा बदल म्हणजे बॉम्ब सायक्लॉन. कॅलिफॉर्नियात atmospheric river आणि bomb cyclone दोन्ही एका वेळी होत आहे.
5 / 11
ज्यावेळेस वातावरणात असे मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतात, त्यावेळेस त्या हवेच्या वरच्या स्तरात बदल होतो. ही वादळं साधारण 24 तासांपर्यंत मर्यादित असतात. तीव्रता अधिक असते.
6 / 11
कॅलिफोर्नियाच्या Bomb Cyclone मुळे मोठं नुकसान झालं आहे. काही तासांत प्रचंड पाऊस यामुळे फ्लॅश फ्लडचा धोका आहे. त्यामुळे अमेरिकेत या भागात हाहाकार उडाला आहे.
7 / 11
कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ रिसर्च च्या म्हणण्यानुसार, Bomb Cyclone आणि या Atmospheric River य़ाचा एकत्र परिणाम येथील स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.
8 / 11
उत्तर कॅलिफोर्निया आणि पॅसिफिच्या वायव्य भागात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. ताशी 97 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
9 / 11
उत्तर कॅलिफोर्निया आणि पॅसिफिच्या वायव्य भागात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. ताशी 97 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
10 / 11
याशिवाय समुद्राच्या लाटा 20 फूट उंचीपर्यंत उसळू शकतात, आणि त्याच वेगात किनाऱ्यावर धडकू शकतात.
11 / 11
बऱ्याच काळानंतर कॅलिफोर्नियामध्ये Bomb Cyclone आलं आहे. जीवितहानी वाचवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था काम करत आहे.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCaliforniaकॅलिफोर्नियाAmericaअमेरिकाcycloneचक्रीवादळ