baba vanga prediction about third world war after syria fall know how it happen
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध? By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 8:59 PM1 / 6प्रसिद्ध ज्योतिषी बाबा वेंगा यांच्या मते, तिसरे महायुद्ध सुरू होण्यास आता काही महिनेच उरले आहेत. मुळच्या बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी गेल्या शतकाच्या अखेरीस जगाचा निरोप घेतला आहे. मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची भाकितं खरी होत आहे. तिसऱ्या महायुद्धासंदर्भातही त्यांनी भाकीत वर्तवले होते आणि जगातील सध्य स्थिती पाहता हे भाकीतही खरे ठरते की काय? अशी भीती आहे. 2 / 6केव्हा सुरू होणार तिसरं महायुद्ध? - बाबा वेंगा यांना त्यांच्या अचूक भाकितांमुळे बाल्कनची नॉस्ट्राडेमस म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी 1996 मध्ये आपल्या मृत्यूपूर्वी भाकीत केले होते की, सीरियाच्या पतनानंतर, तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल. आता सीरियातून येणाऱ्या बातम्या पाहता, बाबा वेंगाची भविष्यवाणी पूर्ण होण्यास फारसा वेळ नाही, असे दिसते.3 / 6सीरियामध्ये युद्धाला सुरुवात - गेल्या आठवड्यातच सीरियामध्ये इस्लामिक बंडखोरांनी राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या राजवटीविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यानंतर, अवघ्या काही दिवसांतच त्यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर अलेप्पोवर ताबा मिळवला आहे. 4 / 6असदच्या सरकारी फौजांनी शहरातून माघार घेतली आहे. बंडखोरांनी मोठ्या प्रमाणात सरकारी सैनिक मारले आहेत आणि आता ते पुढे सरकत आहेत.5 / 6महत्वाचे म्हणजे, असाद यांचा एक मुख्य मित्र 'रशिया' युक्रेन युद्धात अडकला असताना आणि दुसरा मित्र 'हिजबुल्लाह' इस्रायसोबतच्या युद्धानंतर पार कोलमडला असताना, बंडखोरांनी हा हल्ला केला आहे. अशा परिस्थितीत सीरियातील असद सरकारसमोर स्वतःला वाचवण्याचे मोठे आव्हान आहे.6 / 6ही भकितं ठरली आहेत खरी - बाबा वेंगा अंध होत्या, पण त्यांना भविष्य दिसत होते, असे म्हटले जाते. आज त्या हायत नाहीत. मात्र, दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून त्यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. प्रिंसेस डायना आणि ९/११ हल्ल्यासंदर्भातील बाबा वेंगा यांची भाकीतं खरी ठरली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications