२०२५ साठी बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी केली एकसारखी भविष्यवाणी, या देशात होणार विध्वंस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:20 IST
1 / 7२०२४ हे वर्ष सरून २०२५ हे नवं वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. आता या नव्या वर्षात काय काय घडणार हे जाणून घेण्याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, अचूक भविष्यासाठी ओळखले जाणारे प्रख्यात भविष्यवेत्ते नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांच्या २०२५ या वर्षासाठीच्या भविष्यवाण्या समोर आल्या आहेत. 2 / 7या भविष्यवेत्त्यांनी नव्या वर्षात मानवाचा एलियनशी संपर्क, व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न, युरोपमध्ये दहशतवादी हल्ला आणि राजे चार्ल्स यांच्यासाठी एका अशांत सरकारबाबत भविष्यवाणी केली आहे. 3 / 7सर्वात आश्चर्यकारक आणि धक्कादायक बाब म्हणजे बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस या दोघांनीही २०२५ मध्ये यूरोपमध्ये एक विनाशकारी संघर्ष होण्याचं भविष्य वर्तवलं आहे. त्यामुळे या भविष्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. तसेच हे वर्ष ब्रिटनसाठी अशुभ ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या भविष्यवेत्त्यांना केलेल्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्याचाही प्रयत्न सुरू आहे. 4 / 7बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार एक विनाशकारी युद्ध युरोपला उद्ध्वस्त करेल. या युद्धामुळे या खंडातील लोकसंख्या संपुष्टात येईल. सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे पाहिल्यावर बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी आणखी चिंता वाढवणारी आहे. त्याशिवाय नैसर्गिक आपत्तींबातही त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यात अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर भूकंप आणि निद्रिस्त ज्वालामुखींमध्ये विस्फोट आदींचा समावेश आहे. 5 / 7तर नास्त्रेदमस यांनी पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलेल्या आपल्या भविष्यवाण्यांमध्ये युरोपमध्ये एका भयंकर विनाशकारी युद्धाचा इशारा दिला आहे. त्यामुळे केवळ देशच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही शत्रूंची संख्या वाढणार आहे. 6 / 7२०२५ साठीची नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी विशेषकरून भयावह आहे. त्यांनी ब्रिटन एक भयंकर युद्ध आणि प्लेगनंतर उद्ध्वस्त होईल, अशी भविष्यवाणी केली आहे. भूतकाळात उदभवलेली एखादी जीवघेणी साथ पुन्हा येण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच इतरांच्या तुलनेत ती मोठा शत्रू ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे. 7 / 7त्याशिवाय २०२५ हे एक निर्णायक वर्ष ठरेल, असेही नास्त्रेदमस यांनी म्हटले आहे. त्यामध्ये पाश्चात्य शक्तींचा प्रभाव कमी होऊन नव्या जागतिक महासत्तांचा उदय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबरोबरच एक दीर्घकाळापासून सुरू असलेलं युद्ध संपेल आणि सैनिकही लढून थकतील, असं भविष्य वर्तवलं आहे.