शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी चिमुकलीला पाजलं कासवाचं रक्त; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 5:55 PM

1 / 10
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जगभरात तब्बल ५८ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
2 / 10
कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा साडे तीन लाखांपेक्षा जास्त आहे. जवळपास सगळ्याच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
3 / 10
कोरोनावरील लसीचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र अनेक भागांमध्ये उपचाराचा भाग म्हणून केले जाणारे प्रयोग जीवघेणे ठरत आहेत.
4 / 10
कॅरेबियन बेटांवरील डॉमिनिकन रिपब्लिक या देशात कोरोनापासून बचाव करण्यासाठी एका ५ महिन्यांच्या चिमुरडीला रक्त पाजण्यात आलं. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
5 / 10
हैथीमधल्या एका डॉक्टरनं एका कुटुंबाला कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कासवाचं रक्त पिण्याचा सल्ला दिला होता.
6 / 10
कासवाचं रक्त प्यायल्यानंतर ५ महिन्यांच्या वर्षांच्या चिमुकलीनं प्राण सोडला. तर तिच्या सात वर्षीय बहिणीला आणि पालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
7 / 10
कासवाचं रक्त पाजण्यात आल्यानंतर चिमुरड्या मुलीची प्रकृती बिघडली. तिला रोसा डुअर्टे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली.
8 / 10
प्राण्यांचं रक्त गुणकारी असतं, त्यामुळे विषाणूपासून बचाव होतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र असे प्रयोग जीवावर बेततात, असं रुग्णालयाच्या संचालिका डॅहियाना वोलक्वेझ यांनी सांगितलं.
9 / 10
ऑगस्ट २०१२ मध्ये याच कुटुंबातले चौघे जण हैथीमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांना रहस्यमयी आजारानं ग्रासलं होतं.
10 / 10
त्यावेळी एका भोंदूबाबानं भूतबाधा झाल्याचं सांगून कुटुंबातल्या सदस्यांना मारहाण केली. शरीरात भूत उतरवण्याचा दावा त्यानं केला होता. या मारहाणीत चौघांचा मृत्यू झाला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या