शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बलुचिस्तानात हिंसक आंदोलन भडकलं, पाक सैन्य शेपटी वर करून चौक्या सोडून पळालं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 1:21 PM

1 / 7
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात बलुच बंडखोरांविरूद्ध क्रूर मोहीम राबविणार्‍या पाकिस्तानी सैन्याला जबरदस्त झटका बसला आहे. येथील लोकांचा रुद्रावतार पाहून भयभीत झालेल्या पाकिस्तानी सैन्यावर अक्षरशः शेपटी वर करून आणि सरक्षण चौक्या सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे.
2 / 7
बलुचिस्तानच्या ब्राबचाह भागात बलुचिस्तानातील नागरिकांनी जोरदार हिंसक निदर्शने केली आणि दगडफेक केली. यातून आपला जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानी संरक्षण दलाला चौक्या सोडून पळ काढावा लागला.
3 / 7
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या निदर्शनात हजारो लोक सहभागी झाले होते. बलूच आंदोलकांनी चौफेर विरोध केल्यानंतर पाकिस्तानी संरक्षण दाल घाबरले.
4 / 7
बलूच लोकांनी निदर्शनादरम्यान पाकिस्तानी सैनिकांची एक इमारत आणि एक वाहन जाळून टाकले. हे आंदोलन दोन आठवड्यांपासून सुरू आहे.
5 / 7
जवळपास 14 दिवसांपूर्वी बलुचिस्तान प्रांतातील तुरबत शहरात एक महिला आणि तिच्या चार वर्षांच्या मुलीची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.
6 / 7
सत्ताधारी बलुचिस्तान आवामी पार्टीच्या सदस्यांनीच या हत्या केल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे. इम्रान खान सरकारमध्येही हा पक्ष सहभागी आहे.
7 / 7
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि सरकार सातत्याने लोकांवर अत्याचार करत आहे. तेथील लोकांना त्रास देणे, मारणे आणि अपहरणाच्या अनेक बातम्या सातत्याने येत असतात.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानSoldierसैनिक