1 / 11चीनसंदर्भात अमेरिकेची भूमिका अधिक कठोर होताना दिसत आहे. आता अमेरिकेतील एका खासदाराने म्हटले आहे, की चीनमध्ये असलेले उद्योग भारतात शिफ्ट करायला हवेत. जेनेकरून, जगात चीन शिवाय आणखी एक पर्याय उभा राहील. अमेरिकेतील खासदार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या उपसमितीचे सदस्य टेड योहो यांनी हे भाष्य केले आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते.2 / 11चीनसंदर्भात अमेरिकेची भूमिका अधिक कठोर होताना दिसत आहे. आता अमेरिकेतील एका खासदाराने म्हटले आहे, की चीनमध्ये असलेले उद्योग भारतात शिफ्ट करायला हवेत. जेनेकरून, जगात चीन शिवाय आणखी एक पर्याय उभा राहील. अमेरिकेतील खासदार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या उपसमितीचे सदस्य टेड योहो यांनी हे भाष्य केले आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते.3 / 11टेड यांनी सांगितले, की याचे ताजे उदाहरण म्हणजे, जेव्हा संपूर्ण जगाला पीपीईची (PPE) आवश्यकता होती, तेव्हा चीनने हात वर केले. यामुळे संपूर्ण जागचा सप्लाय ठप्प झाला होता. यानंतर आम्ही आमच्या राजदूतांशी, चीनमधील इंडस्ट्री भारता हलवण्यासंदर्भात चर्चा केली.4 / 11टेड म्हणाले, भारतासारख्या इतर मित्र देशांमध्येही आपले उद्योग स्थापन करण्याची आमची इच्छा आहे. असे झाल्यास चीनचे वर्चस्व नष्ट होईल आणि आम्हालाही अनेक पर्याय उपलब्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात मेक इन इंडिया कार्यक्रम चलवत आहेत. यामुळे अशात चीनमधील उद्योग धंदे भारतात आले, तर मोठी संधी मिळेल.5 / 11असे पाऊल उचलल्यास चीनवर आर्थिक दडपण येईल. तसेच बीजिंगदेखील सप्लाय चेनपासून अलग होईल. तेव्हा आम्ही आमचे उद्योगधंदे विशेष करून लाइव्हस्टॉक आणि एपीआय भारत आणि भारतासारख्या मित्र देशांमध्ये हलवू. यामुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षावरील आर्थिक दडपण वाढेल, असे टेड म्हणाले.6 / 11टेड म्हणाले, संपूर्ण जगाने चीनसोबतचे संबंध तोडायला हवे. कारण चीन आपल्या लोकांच्या भल्यासाठी जे बोलतो, तसे ना देशात वागतो, ना इतर देशांशी वागतो. चीनने आमच्यासारखे अथवा भारतासारखे व्हावे, असे मी म्हणत नाही. मात्र, त्याने किमान सन्मान, मानवाधिकार आणि मानुसकीची सवय तरी लाऊन घ्यायला हवी.7 / 11टेड यांनी सांगितले, अमेरिकेची इच्छा नाही, की केवळ चीनलाच जगाची फॅक्ट्री म्हटले जावे, त्यालाही विकसित देशांमध्ये सहभागी करावे, त्याला विकसनशील देशांच्या सुविधा मिळू नेय. चीनला वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइजेशनकडू काही (WTO) मदद मिळू नये.8 / 11टेड म्हणाले, आकाशात दोन सूर्य असूच शकत नाहीत, असा चीनचा सिद्धांत आहे. कुण्या एकाला बाजुला व्हावे लागेल. जगावर राज्या करण्यासाठी, स्वतःला सुपरपावर बनवण्याची त्याची इच्छा आहे. जगाला आर्थिक आणि सैन्य शक्तीच्या आधारावर नाचवायची त्याची इच्छा आहे.9 / 11यावेळी टेड यांनी प्रश्न विचारला, की चीन पाच युद्धनौका कशासाठी तयार करत आहे. त्याने आपले संरक्षण बजेट 6.9 टक्क्यांनी कशासाठी वाढवले. चीन WTOच्या विकसनशील देशांच्या टॅग आडून जगाला मूर्ख बनवत आहे. आता आमच्या कडेही, असा कायदा आहे, की आम्ही तेथून चीनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.10 / 11टेड म्हणाले, चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मठी अर्थव्यवस्था आहे, हे खरे आहे. मात्र तरीही ते विकसनशील देशांच्या टॅग आडून फायदे घेत आहेत. त्यामुळे आता जगाने चीनचे समर्थन करणे बंद केले पाहिजे.11 / 11चीनला धडा शिकवण्यासाठी, अमेरिका चीनवर अत्यंत कठोर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे.