शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुंदर मॉडल जी जगातल्या सर्वात खतरनाक ड्रग माफियाच्या प्रेमात पडली, आता तिला सुद्धा अटक झाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 10:47 AM

1 / 13
जगातला सर्वा मोठा आणि खतरनाक ड्रग लॉर्ड वाकीन गुजमॅन उर्फ एल चापोच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. एमा कोरोनेल एसपुरोला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. एमा माजी ब्युटी क्वीन राहिली आहे.
2 / 13
एमाला व्हर्जिनियाच्या एका इंटरनॅशनल एअरपोर्टवर अटक करण्यात आली. तिच्यावर आरोप आहे की, ती कोकेन, हिरोईनसारखे घातक ड्रग्स सप्लाय करते. त्यासोबतच ती तिच्या ड्रग लॉर्डसोबतच्या नात्यांमुळेही चर्चेत राहिली आहे.
3 / 13
३१ वर्षीय एमाकडे अमेरिकन आणि मेक्सिकन नागरिकत्व आहे. एमावर ड्रग्स सप्लायसोबतच आरोप आहे की, तिने २०१५ मध्ये आपल्या पतीला तुरूंगातून पळवण्याचा प्लॅन केला होता. एमाचे वडील २०१७ मध्ये ड्रग ट्रॅफिकिंगमुळे तुरूंगात गेले होते.
4 / 13
एमाचं बालपण मेक्सिकोच्या डुरांगोच्या डोंगरात गेलं आहे. एमाची एल चापोसोबत भेट २००७ मध्ये झाली होती. त्याचवर्षी एमा १८ वर्षांची झाली होती. दोघांनी लग्न केलं.
5 / 13
एमाला दोन जुळ्या मुली आहेत. लग्नानंतर गुजमेनने आपलं जास्तीत जास्त आयुष्य तुरूंगात नाही तर ऐशो-आरामात घालवलं आहे. लॉस एंजेलिस टाइम्ससोबत बोलताना एमाने एकदा गुजमेनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता.
6 / 13
ती म्हणाली होती की, मला वाटतं त्याचा बोलण्याचा अंदाज, त्याची माझी काळजी घेण्याचा अंदाज जास्त भावला होता. ती म्हणाली होती की, 'पहिल्या भेटीतच आमच्यात चांगली मैत्री झाली होती. तो लोकांना ज्या पद्धतीने भेटत होता, लोक त्यामुळे इम्प्रेस व्हायचे'.
7 / 13
एल चापो आपल्या ट्रायलची वाट बघत आहे तर एमा नेहमीच आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहते. २०१८ मध्ये आपल्या मुलींच्या वाढदिवसाला एमाने आपल्या हवेलीचे फोटो शेअर केले होते आणि आपल्या हवेलीची झलक दाखवली होती.
8 / 13
२०१९ मध्ये एल चापो तुरूंगात गेल्यावर दोन आठवड्यातच एमाने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात केक दिसत होता. एमाला या पोस्टमुळे ट्रोल करण्यात आलं होतं.
9 / 13
यावर्षीच एमाने एल चापोच्या लोकप्रियता जाणून एक कपड्याचा ब्रॅन्ड सुरू केला होता. एल चापोवर अनेक गंभीर आरोप आहेत. ज्यात ड्रग्स तस्करी, हत्या, किडनॅपिंग, रेपसारखे आरोप आहेत.
10 / 13
एमा गुन्हेगार परिवारावर आधारित एका रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. एमाने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती एक सामान्य महिला आहे आणि हे फार दुखद आहे की, लोक आम्हाला जाणून न घेता आमच्या परिवाराबाबत विचार करतात.
11 / 13
एमा मीडियासमोर गुजमेनच्या नात्याबाबत नेहमीच ओपन राहिली आहे आणि नेहमीच सांगितलं आहे की, तिची प्राथमिकता आपल्या मुलींचा सांभाळ करणं ही आहे.
12 / 13
एमा मीडियासमोर गुजमेनच्या नात्याबाबत नेहमीच ओपन राहिली आहे आणि नेहमीच सांगितलं आहे की, तिची प्राथमिकता आपल्या मुलींचा सांभाळ करणं ही आहे.
13 / 13
एमा मीडियासमोर गुजमेनच्या नात्याबाबत नेहमीच ओपन राहिली आहे आणि नेहमीच सांगितलं आहे की, तिची प्राथमिकता आपल्या मुलींचा सांभाळ करणं ही आहे.
टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीMexicoमेक्सिकोAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी