शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! तुमचे स्मार्ट वॉच ठरू शकते जीवघेणे; 'या' गंभीर आजारांचा धोका, धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:11 IST

1 / 9
तुमच्या हाताच्या मनगटावरील स्मार्ट घड्याळ नक्की तुमच्या आरोग्याची काळजीच घेतेय ना ? कारण जगातील काही ब्रॅण्डच्या स्मार्ट वॉचेस तुम्हाला जीवघेण्या कर्करोगाचे गिफ्ट देऊ शकतात.
2 / 9
‘स्टेटस सिम्बल’ समजल्या जाणाऱ्या ॲपल कंपनीच्या ‘ओशन’, ‘नायके स्पोर्ट’ आणि साध्या ‘स्पोर्ट’ या ब्रॅण्डची स्मार्ट घड्याळे धोकादायक असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
3 / 9
‘डेली मेल यूके’ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेत अलीकडेच जगभरातील २२ स्मार्ट वॉच बॅण्डपैकी १५ बॅण्डचा अभ्यास करण्यात आला. परफ्लुओरोल्किल आणि पॉलिफ्लुओरोल्किल सबस्टन्सेस (पीएफएएस) या कर्करोगाचे कारण बनू शकतील अशा हानिकारक रसायनांचा या घड्याळांच्या निर्मितीत वापर करण्यात आल्याचे या अभ्यासातून दिसून आले.
4 / 9
या निष्कर्षांचा आधार घेऊन काहींनी ॲपल कंपनीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे.
5 / 9
विशेष म्हणजे स्मार्ट घड्याळांत वापरकर्त्यांसाठी हार्ट रेट, पल्स रेट, स्लिप हेल्थ, फूट स्टेप्स अशा फीचर्सचा मारा करण्यात आलेला असतो.
6 / 9
कंपनीचे काय म्हणणे ? ॲपल म्हणते की, त्यांच्या उत्पादनांत फ्लुरोइलास्टोमर या घटकाचा वापर करण्यात येतो. हे एक कृत्रिम रबर आहे. त्यात फ्लोरिन असते. मात्र, ‘पीएफएएस’ रसायने नसतात.
7 / 9
मानवी आरोग्याला धोकादायक ठरणार नाहीत, याची खातरजमा करूनच ती आमच्या उत्पादनात वापरली जातात, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
8 / 9
याचिकाकर्त्यांचा काय युक्तिवाद ? कृत्रिम रबरमध्ये ‘पीएफएएस’ रसायने असतात आणि त्याचा वापर आपल्या उत्पादनात केला जातो, हे तथ्य ॲपलने ग्राहकांपासून जाणीवपूर्वक लपवून ठेवले. त्यामुळे जीवघेण्या रोगांचा धोका उत्पन्न झाला, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला आहे.
9 / 9
कोणत्या आजारांचा धोका? जन्मदोष, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, प्रजनन समस्या, मूत्राशयाचा कर्करोग
टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग