शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठा दावा! शेख हसीनांना आर्मीनेच बांगलादेश सोडायला भाग पाडले, दिली ४५ मिनिटे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 9:24 AM

1 / 8
शेजारच्या बांगलादेशमध्ये सत्ता पालट झाला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडून भारतात आल्या आहेत. हवाई दलाच्या विमानाने त्यांना भारतात आणून सोडले खरे परंतू, हसीना यांच्या या पलायनामागे त्यांच्या सैन्याचाच हात असल्याचा दावा केला जात आहे.
2 / 8
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडताच सैन्यानेच आनंदोत्सव साजरा केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. काही वर्षांपूर्वी या सैन्याचीच बांगलादेशवर सत्ता होती. ती पुन्हा येण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. हसीना यांनी सैन्याच्या दबावात न राहता १५ वर्षे देश चालविला होता.
3 / 8
बांगलादेशी मिडीयानुसार सैन्याने शेख हसीना यांना देश सोडण्यासाठी केवळ ४५ मिनिटांचा वेळ दिला होता. देश सोडण्यापूर्वी हसीना या देशाला संदेश देऊ इच्छित होत्या. परंतू सैन्याने त्यांना संबोधित करण्यास दिले नाही.
4 / 8
रविवारी दुपारी बांगलादेश राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलविण्यात आली होती. यात सोमवारी काय काय घडणार याची पटकथा लिहिली गेली होती. सोमवारी होणाऱ्या आंदोलनाला सैन्य सक्तीने रोखणार नाही असे सैन्याने ठरविले होते.
5 / 8
सोमवारी सकाळी ढाक्यातील परिस्थिती एकदम ठीक होती. अचानक हजारो विद्यार्थी गाझीपूर बॉर्डवरून ढाक्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यानंतर लगेचच सैन्याने हसीना यांना ४५ मिनिटांत देश सोडण्याचे आदेश दिले.
6 / 8
एवढ्या कमी वेळात देशच सोडण्याचे आदेश दिल्याने हसीना यांच्यासमोर मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला होता. पोलीस दिसत नव्हते, सैन्य आंदोलकांना काहीच करत नव्हते. अशा परिस्थितीत भारताशी चर्चा सुरु झाली, हसीना यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. मोजून चार-पाच बॅगांमध्ये कपडे, दागिने घेऊन हसीना या भारताकडे बांगलादेशी सैन्याने दिलेल्या विमानात बसल्या.
7 / 8
हसीना हेलिकॉप्टरमध्ये बसतानाचा व्हिडीओ लाईव्ह करण्यात आला. पंतप्रधान आवासातून हे हेलिकॉप्टर झेपावले, परंतू एवढी मोठी गोष्ट लाईव्ह करण्यात आली होती. हसीना देश सोडून जात असल्याचे पाहून रस्त्यावर नावाला बंदोबस्तासाठी आलेल्या तुटपुंज्या सैन्याच्या जवानांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.
8 / 8
काल चिघळलेले वातावरण आज अचानक शांत कसे झाले? आज दुपारी सैन्य प्रमुख आंदोलकांच्या समन्वयकांशी चर्चा करणार आहेत. बांगलादेशमधील कर्फ्यू आज सकाळपासून हटविण्यात आला आहे. सरकारी, निम सरकारी कार्यालये आणि कारखाने आज उघडले जाणार आहेत, असे सैन्याने जाहीर केले आहे. बाजारपेठाही आज सुरु होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश