शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठी बातमी! जगात आणखी एक युद्ध भडकणार?; तालिबानकडून पाकचं हेलिकॉप्टर उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 10:06 PM

1 / 10
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाइनवरून दोन्ही देशांमधील वातावरण पुन्हा तापले आहे. अफगाणिस्तानच्या निमरोज प्रांताला लागून असलेल्या ड्युरंड रेषेवर शुक्रवारीही पाकिस्तान आणि तालिबानी सैनिकांमध्ये गोळीबार झाला होता.
2 / 10
या वेळी तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानकडून तालिबानी जवानांवर मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सीमेवर लष्करी जवानांची संख्या वाढवली आहे.
3 / 10
तालिबान ड्युरंड रेषेला दोन्ही देशांमधील अधिकृत सीमा मानत नाहीत. मात्र त्याचठिकाणी पाकिस्तानी लष्कराकडून जबरदस्तीने कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. त्याला तालिबानींनी विरोध केला आहे. अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच असे घडले आहे.
4 / 10
टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, इस्लामिक अमिरातीचे सैन्य चहरबुर्जक जिल्ह्यातील झाकीर गावाकडे कूच करताना दिसले. त्यांच्या ताफ्यात शेकडो वाहनांसह हेलिकॉप्टरही दिसले. अमेरिकेतील अफगाण पत्रकार हाशिम वाहदत्यार यांनी दावा केला आहे की तालिबानी सैन्याने निमरोज प्रांतातील ड्युरंड रेषेजवळ पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर पाडले. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
5 / 10
पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने पाकिस्तानी हेलिकॉप्टरवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा एक जनरल गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने तालिबानला येत्या २४ तासांत हल्लेखोरांना ताब्यात देण्याची विनंती केली आहे.
6 / 10
मात्र, तालिबानने पाकिस्तानची ही विनंती फेटाळून लावली आहे. त्यानंतर पाकिस्तानी लष्करानेही निमरोज प्रांताला लागून असलेल्या भागात सैन्याची संख्या वाढवली आहे. तालिबानी दहशतवादी पाकिस्तानी लष्करावर संभाव्य हल्ल्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
7 / 10
यावर्षी फेब्रुवारीमध्येही कुनारच्या दंगम जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान यांच्यात चकमक झाली होती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने तालिबानच्या विरोधात जोरदार तोफखाना वापरला. त्याचप्रमाणे डिसेंबर २०२१ मध्ये कुनार प्रांतात ड्युरंड रेषेजवळ पाकिस्तानी लष्कर आणि तालिबानी लडाकू यांच्यात गोळीबार झाला होता.
8 / 10
त्यानंतर तालिबानने ड्युरंड रेषेवर कुंपण घालणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलले. एवढेच नाही तर तालिबानने कुंपणाचे साहित्यही नष्ट केले होते. दोघांमध्ये गोळीबारही झाला होता. यात काही पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. तालिबानींना पाहून पाकिस्तानी सैनिक पळून गेल्याचा प्रकार घडला होता.
9 / 10
अफगाणिस्तानचे क्षेत्र सध्याच्या सीमेच्या पलीकडे असल्याचा दावा केला आहे. हा एकमेव मुद्दा आहे ज्यावर अफगाणिस्तानचे माजी नागरी सरकार आणि तालिबान यांच्यात सहमती होती. तालिबानने ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानचे कुंपणही पाडले.
10 / 10
अफगाणिस्तानातील बहुसंख्य पश्तून आणि तालिबान यांनी कधीही ड्युरंड रेषा अधिकृत सीमारेषा मानली नाही. तालिबानचा सर्वोच्च प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर लगेचच सांगितले होते की, नवीन अफगाण सरकार या विषयावर आपली भूमिका जाहीर करेल. त्यानुसार तालिबाननं तीच भूमिका घेतली आहे.
टॅग्स :TalibanतालिबानPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान