शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 11:24 AM

1 / 10
जगभरात चीनला बनावट वस्तू बनविणारा देश म्हणून ओळखले जाते. या वस्तू बनावट असल्याने त्याची किंमत आणि आयुष्यही कमीच असते. ते मग कोणतेही उत्पादन असो, वाहने, मोबाईल किंवा खेळणी आदी साऱ्याची चीनमध्ये नक्कल केली जाते. याच नक्कलबाजीने चीनच्या बँकांनाही मोठा गंडा घातला आहे. चीनमध्ये सोन्याच्या साठ्यापैकी 4 टक्के म्हणजेच 83 टन सोने बनावट निघाले आहे.
2 / 10
हा घोटाळा चीनच्या एका मोठ्या ज्वेलरी कंपनीने केला असून या कंपनीचे मुख्यालय कोरोनाच्या जन्मस्थानी म्हणजेच वुहानमध्ये आहे.
3 / 10
झिरो हेज नावाच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती आहे. किंगोल्ड ज्वेलरी कंपनी वुहानची आहे. या कंपनीने चीनच्या 14 शॅडो बँका म्हणजेच कर्ज पुरविणाऱ्या बँकांकडून 21,148 कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. यासाठी कंपनीने 83 टनांचे बोगस सोने म्हणजेच सोन्याची बिस्किटे तारण ठेवली आहेत.
4 / 10
हा चीनच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा मानला जात आहे. या घोटाळ्यामुळे पुन्हा वुहान शहर बदनाम होऊ लागले आहे. याच शहरातून पूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला होता.
5 / 10
किंगोल्ड ज्वेलरी कपंनी नॅसडॅकच्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. ही जगातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे जी सोन्याचे काम करते. या कंपनीचे बाजारमुल्य 8 दशलक्ष डॉलर एवढे आहे. या कंपनीचा मालक चीनी लष्कराचा माजी अधिकारी जिय झिहोंग आहे.
6 / 10
झिरो हेजनुसार चीनच्या या कंपनीने 17017 कोटी रुपयांच्या कर्जासाठी 83 टन सोन्याच्या विटा ठेवल्या होत्या. मात्र, तपासणीमध्ये ते तांबे असल्याचे आढळून आले आहे.
7 / 10
आता हे कर्ज कंपनीच्या 32.73 कोटी रुपयांच्या संपत्तीतून वसूल केले जाणार आहे. हे वसुलीचे काम चीनची विमा कंपनी पीआयसीसी प्रॉपर्टी अँड कॅजुल्टी कोऑपरेटिव लिमिटेड करणार आहे. याशिवाय काही छोट्या विमा कंपन्याही मदत करणार आहेत.
8 / 10
किंगोल्ड कंपनीने डोंगगुआन ट्रस्ट को. लिमिटेडचे कर्ज फेडले नाही. तेव्हा डोंगगुआनने कंपनीने तारण ठेवलेली सोन्याची बिस्किटे जप्त केली. या बिस्किटांच्या तपासणीवेळी किंगोल्ड कंपनीची पोलखोल झाली. तपासणीत समजले की ते सोनो नाही तर तांबे आहे. यानंतर किंगोल्ड कंपनीला कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
9 / 10
यानंतर किंगोल्ड कंपनीला सर्वाधिक कर्ज दिलेल्या चायना मिनशेंग ट्रस्टने कोर्टात धाव घेऊन कंपनीने ठेवलेल्या सोन्याची तपासणी करण्याचे आदेश काढले. 22 मे ला तपासणीमध्ये मिनशेंगमध्येही ठेवलेले सोने बनावट निघाले.
10 / 10
दरम्यान, किंगोल्डचा मालक जिया झिहोंग याने या घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत. आम्ही कोणत्याही बँकेत सोन्याचे बनावट बार ठेवलेले नसून त्यांच्या तारण म्हणूनही वापर केलेला नाही.
टॅग्स :chinaचीनfraudधोकेबाजीGoldसोनं