ब्लू ओरिजिनने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिला ११ मिनिटांत अंतराळ प्रवास करून परतल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 23:53 IST
1 / 8अमेरिकन उद्योगपती जेफ बेझोस यांच्या अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिनचे न्यू शेपर्ड रॉकेट सोमवारी अंतराळाच्या प्रवासावरुन जाऊन आले.2 / 8न्यू शेपर्ड रॉकेट या अंतराळयानात प्रसिद्ध पॉप स्टार केटी पेरीसह सहा महिला अंतराळात जाऊन आल्या आहेत. या मोहिमेचे नाव 'ऑल वुमन मिशन' असं होतं.3 / 8ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटने वेस्ट टेक्सास येथून उड्डाण केले. हे रॉकेट सुमारे १०५ किलोमीटर उंचीवर पोहोचले, तेव्हा महिला प्रवाशांना काही मिनिटांसाठी गुरुत्वाकर्षणाचा अनुभव आला. 4 / 8टेक्सासमधील व्हॅन हॉर्न लाँच पॅडवरून संध्याकाळी ७ वाजता रॉकेटने उड्डाण केले. ११ मिनिटांनी हे यान परतले. या कालावधीत, रॉकेटने जाणे आणि परत येणे यासह एकूण २१२ किमी अंतर कापले.5 / 8पॉप सिंगर केटी पेरीसह सहा महिलांनी अंतराळ प्रवास केला. यापूर्वी १९६३ मध्ये, व्हॅलेंटिना तेरेशकोवा ही पहिली महिला अंतराळवीर होती.6 / 8या मोहिमेत केटी पेरीसह, महिला पत्रकार गेल किंग, बेझोस यांची होणारी पत्नी लॉरेन सांचेझ, मानवाधिकार कार्यकर्त्या अमांडा नुएन, एरोस्पेस अभियंता आयशा बो आणि चित्रपट निर्मात्या करेन फ्लिन या होत्या. उड्डाणाची सर्व तयारी लॉरेन सांचेझने केली होती. 7 / 8ब्लू ओरिजिन रॉकेटवर अंतराळात ११ मिनिटांच्या प्रवासाचा खर्च अंदाजे १.१५ कोटी रुपये आहे. ब्लू ओरिजिनचे प्रवक्ते बिल किर्कोस यांनी सीएनएनला सांगितले की आजच्या फ्लाइटमधील काहींनी भाडे दिले, तर काहींनी मोफत प्रवास केला.8 / 8केटी पेरीने या मोहिमेला मानवतेसाठी आणि महिलांसाठी एक मोठे पाऊल म्हटले. अंतराळ प्रवासाच्या भविष्यासाठी हा एक खास क्षण आहे, असे केटी पेरी म्हणाली.