शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रिटनमध्ये कोरोनावरील लस देताच पहिल्याच दिवशी दोघे जण आजारी, हा इशारा करण्यात आला जारी

By बाळकृष्ण परब | Published: December 10, 2020 7:52 AM

1 / 6
कोरोना विषाणूच्या झपाट्याने होत असलेल्या फैलावामुळे संपूर्ण जग चिंतीत आहे. कोरोनाला रोखण्याचा उपाय म्हणून संपूर्ण जगामधून कोरोनावरील लसीची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक असलेल्या ब्रिटनमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
2 / 6
दरम्यान, ब्रिटनमध्ये फायझरने विकसित केलेल्या कोरोना लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली असून, हे डोस घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी दोघे जण आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. आजारी पडलेल्या दोन्ही व्यक्ती आरोग्य कर्मचारी असून, त्यांना लसीमुळे अॅलर्जी रिअॅक्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने या घटनेला दुजोरा दिला आहे.
3 / 6
दोन्ही पीडित आरोग्य कर्मचारी Anaphylactoid Reactions चे शिकार झाले आहेत. त्यानंतर ब्रिटनच्या रेग्युलेटरी एजन्सीने एक इशारा जारी केला आहे. अशा कुठल्याही व्यक्तीला ज्यांना कुठलेही औषध, अन्न आणि लसीची अॅलर्जी आहे, अशांना फायझरची लस देण्यात येऊ नये, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे.
4 / 6
ब्रिटनमध्ये आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वात आधी फायझरची कोरोनावरील लस देण्यात येत आहे. तर एनएचएसचे नॅशनल मेडिकल डायरेक्टर प्राध्यापक स्टीफन पोविस यांनी सांगितले की, लसीमुळे अॅलर्जीची शिकार झालेल्या दोन्ही व्यक्तींची प्रकृती आता हळूहळू सुधरत आहे. या दोन्ही व्यक्तींना आधीपासूनच अॅलर्जीचा त्रास होता.
5 / 6
ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला ८० वर्षांवरील वयाच्या लोकांना फायझरची लस देण्यात येत आहे. त्यासाठी देशामध्ये ५० केंद्रे उभारण्यात आली आहेत. पूर्णपणे विकसित कोरोना लसीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लसीकरणाची सुरुवात करणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे. मात्र अमेरिकेने कोरोनावरील फायझरच्या लसीच्या वापराला अद्याप परवानगी दिलेली नाही.
6 / 6
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ब्रिटनकडून कोरोनाच्या आठ लाख डोसचा वापर करण्यात येणार आहे. मात्र ख्रिसमसपर्यंत देशामध्ये कोरोनाच्या लसीचे लाखो डोस उपलब्ध होतील, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी सांगितले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडHealthआरोग्य