शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Covishield: कोरोना लस! आता ऑक्सफर्डच्या घोषणेकडेच ब्रिटनचे लक्ष; थेट कायद्यात बदल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 3:25 PM

1 / 10
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठीकडून संशोधन केलेल्या कोरोना लसीची शेवटच्या टप्प्यातील कोरोना चाचणी सुरु आहे. ही लस लवकरात लवकर बाजारात येण्य़ासाठी ब्रिटन कायद्यामध्येच बदल करणार आहे. यामुळे कमीतकमी वेळात या लसीला मंजुरी दिली जाणार आहे.
2 / 10
ऑक्सफर्डचे वैज्ञानिक जसे घोषणा करतील त्याचवेळी ही लस लोकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.
3 / 10
कोणतीही लस यशस्वी झाली की तिला मंजुरी आणि लायसन मिळण्यासाठी अनेक महिने लागतात. जर कोरोनावरील लस सुरक्षा चाचणीमध्ये पास झाली तर या लसीला लगेचच मंजुरी दिली जाईल.
4 / 10
ब्रिटेनचे उप मुख्य वैद्यकीय अधिकारी जोनाथन वॅन टॅम यांनी सांगितले की, जर आम्ही कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्य़ात यशस्वी झालो तर ती लस लवकरात लवकर रुग्णांसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा आम्ही सुरक्षा चाचण्या पार करू शकू.
5 / 10
याआधी ऑक्सफर्डच्या लस बनविणाऱ्या टीमच्या एका अधिकाऱ्याने अँड्यू पोलर्ड यांनी सांगितले की, लसीला मंजुरी मिळविण्यासाठी तिच्या चाचण्यांची माहिती या वर्षीच सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
6 / 10
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची चाचणी अनेक देशांमध्ये केली जात आहे. यामध्ये ब्रिटनसह ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथील जवळपास 20000 लोकांवर चाचणी सुरु आहे.
7 / 10
ऑक्सफर्डसोबत करार असलेली कंपनी अॅस्ट्राझिनेका अमेरिकेत 30000 लोकांवर चाचणी घेत आहे. भारतातही सीरम इन्स्टीट्यूट यालसीची चाचणी करत आहेत.
8 / 10
एवढेच नाही तर पुण्यामध्ये सीरमने कोरोना लस बनविण्यास सुरुवात देखील केली आहे. डिसेंबरपर्यंत ही लस बनविली जाणार आहे. Covishield असे तिचे नाव असून 300-400 दशलक्ष डोस बनविले जाणार आहेत.
9 / 10
भारत तब्बल 17 सेंटर्सवर 1600 लोकांवर हे परीक्षण 22 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. प्रत्येक सेंटरवर जवळपास 100 स्वयंसेवक आहेत. नोव्हेंबरपर्यंत हे परिक्षण पूर्ण होण्याची आशा आहे.
10 / 10
जगभरातील देशांचा ऑक्सफर्डची लस विकत घेण्याकडे ओढा आहे. यूनायटेड किंगडमने 100 मिलियन डोसची डील केली आहे. ब्राझील सरकारनेही 127 मिलियन डॉलरमध्ये 30 मिलियन डोसचा सौदा केला आहे. याशिवाय यूरोपियन यूनियनमधील अनेक देश सध्या सौदा करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ऑक्‍सफर्डने म्हटले आहे, की यूकेमध्ये ही लस स्वस्तात उपलब्ध होईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याLondonलंडन