शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia-Ukraine War: खैर नाही! युक्रेनमध्ये ब्रिटनच्या छोट्या ब्रम्हास्त्राने कहर मांडला; रशियन लढाऊ विमाने मच्छरांसारखी पळू लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 5:07 PM

1 / 8
युक्रेनने एवढे दिवस अमेरिकेच्या स्टिंगर मिसाईलच्या जोरावर रशियन फौजांना रोखले होते. अन्य शस्त्रास्त्रे देखील होती, परंतू रशियाची चिलखती वाहने या खतरनाक मिसाईलमुळे पुढे जाऊ शकली नाहीत. या मिसाईलच्या जोडीला आता ब्रिटनचे अत्यंत छोटे मिसाईल आले आहे. हे एक प्रकारचे मिसाईल डिफेन्स सिस्टिमच आहे.
2 / 8
ब्रिटनने मॅन पोर्टेबल एयर डिफेंस सिसटम्स (MANPADS) युक्रेनला दिली आहे. याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते हाताने कुठेही नेता येते एवढे हलके आणि छोटे आहे. या स्टारस्ट्रीक मिसाइल (STARStreak Missiles) ने रणगाडे, चिलखती वाहने आणि हवेत झेपावलेली शत्रूची लढाऊ विमाने देखील क्षणार्धात पाडता येतात.
3 / 8
या छोट्या मिसाईलमुळे युक्रेनी सैन्य रशियाची लडाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरची मारक क्षमताच उध्वस्त करत सुटले आहे. युक्रेनला अमेरिकेसह नाटोदेशांनी लढाऊ विमाने आणि डिफेन्स सिस्टिम पुरविल्या आहेत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी रशियन विमाने अत्यंत खालून झेपावत आहेत. हीच संधी युक्रेनी सैन्य साधत आहे.
4 / 8
MANPADS द्वारे अचूक निशाना लावत युक्रेनी सैन्य लढाऊ विमाने पाडत आहे. ब्रिटनने ही डिफेन्स सिस्टिम १९८० मध्ये डिझाईन केली होती. 1997 पासून तिचा वापर सुरु झाला. आजवर ७००० डिफेन्स सिस्टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे वजन फक्त 14 किलोग्रॅम आहे व लांबी 4 फूट 7 इंच आहे.
5 / 8
स्टारस्ट्रीक क्षेपणास्त्राची रेंज 3 ते 7 किलोमीटर आहे. त्याच्या वॉरहेडमध्ये तीन स्फोटक बाण बसवलेले असतात. हे टंगस्टन मिश्रधातूपासून बनलेले आहेत. जे टँकसारख्या चिलखती लोखंडी वाहनांनाही छेदतात आणि फुटतात. बाणांचे वजन 450 ग्रॅम आहे.
6 / 8
ही सिस्टिम दुर्बीनीसारखी जमीनीवरील ट्रायपॉडवर देखील लावता येते. चिलखती किंवा वाहनांवर देखील लावता येते. कॉम्प्युटरद्वारे ऑपरेटही करता येते. याचबरोबर एखादा व्यक्ती ती उचलून दुसऱ्या जागेवरून हे मिसाईल लाँच करू शकतो.
7 / 8
निशाना साधण्यासाठी यामध्ये लेझर लाईट असते, तसेच झूम करण्यासाठी लेन्सही असते. स्टारस्ट्रीक मिसाईल्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते रात्रीच्या वेळीही डागता येते. त्याला इन्फ्रारेड, रेडिओ, रडारशी जोडूनही चालविता येते.हे ध्वनी, उष्णता आणि रेडिओ लहरी कॅप्चर करून शत्रूवर हल्ला करू शकते. अँटी रडार क्षेपणास्त्राद्वारेही या मिसाईलचा वेध घेतला जाऊ शकत नाही.
8 / 8
स्टारस्ट्रीक क्षेपणास्त्राचे 8 प्रकार आहेत. अपाचे हेलिकॉप्टरपासून ते नौदलाच्या नौकांवर ही मिसाईल लादली जाऊ शकतात. लष्करही ते वापरू शकते. या सिस्टिमध्ये अमेरिकेनेही आता आपली वेगळी मिसाईल तयार केली आहेत. स्टारस्ट्रीक क्षेपणास्त्रांचा वापर सध्या इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि युक्रेन करत आहेत.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया