शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रिटनच्या महालांमध्ये शुकशुकाट; जिथे एका रात्रीचं भाडं आहे लाखोंच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 5:18 PM

1 / 10
ब्रिटिश राजेशाही, राजघराणे, राजवाडे आणि त्यांचे राजपुत्र जगभर प्रसिद्ध आहेत. आता प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे 9 विशाल आणि भव्य राजवाडे उजाड झाले आहेत.
2 / 10
. या राजवाड्यांच्या देखभालीचं लाखो कर्मचारी काम करतात. राजवाड्यांची सध्याची परिस्थिती काय, याबद्दल जाणून घेऊया.
3 / 10
100 वर्ष जुन्या गोरिंग हॉटेल हे राजशाही कुटुंबाचे आवडते ठिकाण आहे. जर कोणाला या हॉटेलचा शाही अनुभव घ्यायचा असल्यास त्याला ५ हजार पाऊंड म्हणजेच भारतीय चलनानुसार 4, 47, 254 एवढे पैसे मोजावे लागतात.
4 / 10
दक्षिण पश्चिम लंडनमधील रिचमंडजवळील हॅम्प्टन कोर्ट पॅलेसही भव्यदिव्य आहे. हा पॅलस हेनरी अष्टम यांनी बांधला आहे. या राजवाड्याचं भाडंसुद्धा लाखोंच्या घरात आहे.
5 / 10
स्कॉटलंडमधील होलीरूड हाऊस हे ब्रिटीश क्वीनचे अधिकृत निवासस्थान आहे.
6 / 10
प्रिन्स विल्यम्स, त्यांची पत्नी कॅथरीन आणि प्रिन्स हॅरी यांचे अधिकृत निवासस्थान केन्सिंग्टन पॅलेस आहे. आता कोरोना वेगळ्या झाल्यानंतर हा राजवाडाही ओसाड पडला आहे. या घरात राणी व्हिक्टोरिया यांचे बालपणी वास्तव्य होते.
7 / 10
ही ब्रिटानिया ही शाही नौका आहे. 40 वर्षात,राणीने या शाही बोटीने बहुतेक प्रवास केला आहे. आतापर्यंत या नौकेनं १० लाख मैलाचा प्रवास केला आहे.
8 / 10
प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांनी त्यांच्या हनीमूनसाठी रॉयल नौका निवडली होती. रॉयल नौकेचं भाडंसुद्धा लाखांमध्ये आहे.
9 / 10
बालमोरल इस्टेट हा राजशाही घराण्याचा प्राचीन वारसा आहे. स्कॉटलंडमधील महाराणीच्या बालमोरल इस्टेट पैसे खर्च करून आपण राहू शकता. कीव पॅलेस हा एकमेव वाडा आहे जिथे आपण सहज भेट देऊ शकता.
10 / 10
आता कोरोनाच्या भीतीमुळे येथे प्रवेशास मज्जाव केला आहे. लंडनमधील टेम्स नदीच्या काठावर बांधलेल्या या राजवाड्याच्या भव्यतेचा अंदाज यावरून काढला जाऊ शकतो, की राणी एलिझाबेथने 2006 साली आपला 80 वा वाढदिवस साजरा केला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या