british scientists warn of super mutant corona mutant with potential to kill every one in 3 persons
भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक; 3 पैकी एकाचा होईल मृत्यू, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 10:45 AM1 / 17जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 2 / 17प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटापुढे हतबल झाले आहेत. सर्वच देशांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या व्हेरिएंटची लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. जगभरात यावर संशोधन सुरू आहे. 3 / 17कोरोनाबाबत आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक असून 3 पैकी एकाचा मृत्यू होईल असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांनी हा गंभीर इशारा दिला आहे. 4 / 17गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं सर्वात जास्त खतरनाक रुप आता समोर आलं आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीन पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. 5 / 17ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. सायंटिफिक एडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 6 / 17रिपोर्टनुसार, कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट MERS व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणं अटळ आहे.7 / 17कोरोनाचा भविष्यात येणारा सर्वाधिक घातक व्हेरिएंट हा प्राण्यांपासून येण्याची शक्यता संशोधन करणाऱ्या गटाने वर्तवली आहे. त्यामुळे कोरोनाचा पुढील व्हेरिएंट रोखायचा असेल तर व्हायरस असणाऱ्या प्राण्यांना मारावं लागेल.8 / 17कोरोनाच्या या व्हेरिएंटवर कोविड 19 ची लसही कुचकामी ठरू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी रिसर्चमध्ये दिला आहे. जर असं झालं तर जगभर मृत्यूदरात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 17कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक असून कांजण्यांप्रमाणे वेगाने संसर्ग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे संक्रमणाचा वेग अधिक पटीने वाढला आहे. 10 / 17कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतरांपेक्षा अधिक गंभीर आहे. कांजण्यांप्रमाणे तो पसरत आहे. अमेरिकन आरोग्य प्राधिकरणाच्याअंतर्गत दस्तऐवजाचा हवाला देत, मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. 11 / 17कोरोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेल्या दोन्ही गटाकडून या व्हायरसचा प्रसार केला जाऊ शकतो, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थातच सीडीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे लसीकरण घेतलेल्या लोकांना देखील विशेष काळजी घेण्याच गरज आहे. 12 / 17डेल्टा व्हायरसचा संसर्ग नाक आणि घशावाटे होतो. लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले लोकं सारख्याच प्रमाणात या व्हायरसचा प्रसार करू शकतात. पण प्रत्येक वेळी असंच घडेल, हे मात्र नक्की नाही. 13 / 17डेल्टा व्हेरिएंट हा मर्स, सार्स, इबोला, सर्दी, फ्लू सारखा वेगानं पसरतो. हा व्हायरस कांजण्यांसारखाच संसर्गजन्य असल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सनेही दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. 14 / 17कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार असून जीवघेणा होईल असं म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल. 15 / 17डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असं देखील WHO ने म्हटलं आहे. लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देणं गरजेचं आहे नाहीतर हा धोका खूप वाढेल. 16 / 17सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सर्व देशांनी आपल्या देशातील कमीतकमी 10 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करणं गरजेचं आहे असं आवाहन WHO ने केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. 17 / 17चार चिंताजनक कोरोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये, गेल्या चार आठवड्यांत सरासरी संसर्ग 80 टक्क्यांनी वाढला आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications