शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुगलवर शोधलं 'सर्वात खतरनाक ठिकाण', तिथे फिरायला गेला आणि मग घडलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 2:08 PM

1 / 8
काही वेगळं करण्याच्या नादात अनेक लोक अडचणीत सापडतात. असंच काहीसं ब्रिटनमधील एका विद्यार्थ्यासोबत झालं आहे. २४ वर्षीय माइल्स रूटलेजने गुगलवर पर्यटकांसाठी जगातलं सर्वात खतरनाक शहर कोणतं? असं टाइप केलं होतं. त्यानंतर माइल्स अफगाणिस्तानसाठी निघाला होता. पण त्याला अंदाज नव्हता की, तिथे त्याला तालिबानचा सामना करावा लागेल.
2 / 8
अफगाणिस्तानमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यावर माइल्स काबुलमध्ये अडकला होता. त्याने अनेकदा तेथून निघण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते काही जमलं नाही. तो एका यूएन सेफहाउसमध्ये लपला होता. पण आता त्याला सुरक्षित काबुलमधून बाहेर काढण्यात आलंय. माइल्स त्याच्या या प्रवासाचे अपडेट फेसबुक आणि ट्विचवर शेअर करत आहे.
3 / 8
माइल्सने काबुलमद्ये काही आठवडे राहण्याचा विचार केला होता. पण तालिबान आल्याने त्याला आपला विचार बदलावा लागला आणि त्याला अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली. बर्मिंघम शहरात फिजिक्सचा स्टुडंट असलेल्या माइल्सने फेसबुकवर आपल्या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या अनुभव सांगितला. या पोस्टसोबत त्याने एका फोटोही शेअर केला ज्यात तो आर्मी गिअरसोबत दिसत आहे.
4 / 8
त्याने पोस्टमध्ये लिहिले की, मी आणि आणखी १०० लोक सुरक्षित बाहेर पडलो. तालिबानने आम्हाला एअरपोर्टवरून जाऊ दिलं. आम्ही काही तालिबानी लोकांनाही भेटलो. काहींसोबत आम्ही सेल्फीही काढला. आम्ही आता एका सेफहाउसमध्ये आहोत.
5 / 8
याआधी रविवारी माइल्स त्याच्या ऑनलाइन व्हिडीओत म्हणाला होता की, तो मरणासाठी तयार झाला आहे. तो म्हणाला होता की, मी धार्मिक आहे त्यामुळे मला वाटतं देव माझी काळजी घेईल. मी जाण्यापूर्वी आपल्या मित्रांना पत्रही लिहिलं होतं. ज्यात लिहिलं होतं की, मी मेलो तर दु:खी होण्याची गरज नाही.
6 / 8
तेच माइल्सच्या आईने सन ऑनलाइनसोबत बोलताना सांगितलं होतं की, तो ब्रिटिश प्रशासनच्या कॉलची वाट बघत आहे. ते सांगणार होते की, अफगाणिस्तानमध्ये त्यांचा मुलगा सुरक्षित आहे की नाही. तेच माइल्सचे युनिव्हर्सिटीतील मित्र म्हणाले की, माइल्सला आपल्या या अजब ट्रिपने मित्रांसमोर शो ऑफ करायला होता.
7 / 8
तो पुढे म्हणाला की, त्याला मीम्स पसंत आहेत आणि त्या त्याच्या या ट्रिपबाबत ऑनलाइन युनिव्हर्सिटी फोरमवर पोस्टही केली आहे. त्याला अनेकांनी असं करण्यास रोखण्याचाही प्रयत्न केला होता. तो फायटर नाहीये. तो युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना सांभाळू शकत नाही तर तालिबानी तर दूरचा विषय आहेत.
8 / 8
माइल्सच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं की, तो अजब ट्रिपवर गेला आहे. तो त्याला अफगाणिस्तानातील स्थितीबाबत इंटरेस्ट आहे म्हणूनही गेला नाही. तो तिथे केवळ टाइमपास करण्यासाठी गेला होता. पण आता तिथे स्थिती खराब झाली आहे आणि त्याला परत येण्यासाठी अडचण येत आहे.
टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान