Capture in the size of the largest jellyfish in man's size
माणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद! By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 2:16 AM1 / 5 इंग्लंडच्या कार्नविलमध्ये दीड मीटर लांब माणसाच्या उंची एवढी जेली फिश आढळली आहे. पाण्यात खोलवर डायव्हिंग करताना ही जेली फिश टिव्ही प्रेझेंटर लिजीने पाहिलं. लिजीनुसार, त्याने पहिल्यांदाच इतकी मोठी जेली फिश पाहिली. 2 / 5मरिन एक्सपर्टनुसार, ही जेली फिश अशी प्रजाती आहे, जी आकाराने सर्वात मोठी असते. याला बॅरेल जेलीफिशही म्हणतात. ही खासकरून ब्रिटनमध्ये आढळते. या जेली फिशचं वजन ४५ किलोग्रॅमपर्यंत असेल आणि रूंदी साधारण ९० सेंटीमीटरपर्यंत असेल.3 / 5बॅरेल जेली फिश ही सर्वात जास्त ब्रिटनच्या कॉर्नविलमध्ये आढळतात गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत गेल्या काही दिवसांमध्ये या फिश कॉनवेलमध्ये अनेकदा बघायला मिळाल्या. मात्र, ब्रिटन आढळलेला हा पहिला मोठा समुद्री जीव नाहीये. याआधी ८ फुटाची १३३ किलो वजनी शार्क पोर्टलँडमध्ये आढळली होती. जी ग्रेट व्हाइट शार्कची एक प्रजाती होती.4 / 5मरिन एक्सपर्टनुसार, बॅरेल जेली फिशचे स्टींग फार कमजोर असतात, त्यामुळे ती मनुष्याला अधिक नुकसान पोहचवू शकत नाही. ही फिश समुद्रातील फार छोट्या जिवांना खाते. ही फिश उन्हाळ्यात ब्रिटनच्या तटावर बघायला मिळते. 5 / 5ही जेली फिश अशी प्रजाती आहे, जी आकाराने सर्वात मोठी असते. याला बॅरेल जेलीफिशही म्हणतात. ही खासकरून ब्रिटनमध्ये आढळते. आणखी वाचा Subscribe to Notifications