शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Carbon Free Countries: अशक्यही शक्य...! तीन देशांत प्रदूषण शून्य; एक तर भारत-चीनचा सख्खा शेजारी, तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 8:49 PM

1 / 5
जेव्हा अखंड जग जलवायू परिवर्तनाच्या धोकादायक संकटाचा मारा सहन करत आहे, तेव्हा जगातीलच हे तीन देश सुखाची आणि स्वच्छ हवेत झोप घेत आहेत. विकसनशील देशांना कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे सांगण्यात आले आहे. हे एक मोठे आव्हान आहे. असे असताना या तीन देशांमध्ये झिरो कार्बन आहे. विश्वास बसणार नाही एक देश तर भारताचा सख्खा शेजारी आहे, तर दोन देश हे अमेरिकेतील आहेत. हे तिन्ही देश कार्बन निगेटिव्ह देश बनले आहेत.
2 / 5
भूतान, सुरीनाम आणि पनामा या तीन देशांना कार्बन निगेटिव्ह देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. कार्बन उत्सर्जन/फुटप्रिंट म्हणजे एखाद्या संस्थेने किंवा व्यक्तीने केलेल्या एकूण कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण असते. हे उत्सर्जन कार्बन डायऑक्साइड किंवा हरित वायूंच्या स्वरूपात होते. हे हरित वायू कमी करण्याचे आव्हान जगासमोर आहे. जेव्हा कार्बन डायऑक्साइड आणि त्याच्या समतुल्य (CO2e) हरित वायूंचे उत्सर्जन शून्यापेक्षा कमी असते तेव्हा त्याला कार्बन निगेटीव्ह म्हणतात. कार्बन उत्सर्जित न करणे अशक्य आहे, त्यामुळे काही प्रमाणाच्या आत असेल तर त्याला निगेटीव्ह मानले जाते.
3 / 5
भूतानने नेट-झिरो प्रतिज्ञा घेतली नव्हती, कारण भूतानला त्याची गरजच नव्हती. भूतानची जंगले वर्षाला सुमारे 9 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेतात. तर या देशातून दरवर्षी होणारे एकूण कार्बन उत्सर्जन ४ दशलक्ष टनांपेक्षा कमी आहे.
4 / 5
सूरीनाम हे नाव अनेकांना माहिती नसेल. परंतू, पृथ्वीवरील सर्वात घनदाट जंगल याच देशात आहे. हा दक्षिण अमेरिकेतील देश आहे. या देशाचा ९७ टक्के भूभाग हा जंगलांचा आहे. देश आर्थिकदृष्ट्या कृषी उत्पादने, बॉक्साइट, सोने आणि पेट्रोकेमिकल्स यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे, परंतु आपल्या जंगलांचे संरक्षण करण्यात यशस्वी ठरला आहे.
5 / 5
तिसरा देश खूप प्रसिद्ध आहे, पनामा. दक्षिण अमेरिकेतीलच हा देश आहे. डोंगररांगा, नद्या आणि उष्णकटीबंधीय प्रदेश आगे. या देशाचा ५७ टक्के भूभाग हा वनसंपदांनी नटलेला आहे. 2023 पर्यंत इंधन आणि कोळसा बंद करण्याचे तसेच 2050 पर्यंत 50,000 हेक्टर जमिनीचे घनदाट जंगलात रूपांतर करण्याचे पनामाचे उद्दिष्ट आहे.
टॅग्स :Bhutanभूतानpollutionप्रदूषण