शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chandra Grahan 2021 Photos: चंद्रग्रहण, ब्लड मून आणि सुपरमून आज एकत्रच पहा; जगभरातून एकसो एक फोटो पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 6:56 PM

1 / 10
वर्षाचे पहिले चंद्रग्रहण सुरु झाले आहे. ते सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी संपणार आहे. हे चंद्र ग्रहण भारतातील काही भागांमध्ये अंशत: दिसणार आहे. हे चंद्र ग्रहण पूर्णपणे पूर्वेकडील आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत दिसायला सुरु झाले आहे. (Lunar Eclipse 2021 Today Live Updates: The lunar eclipse is now over. The full eclipse began at 11.11 am UTC, which was around 4.41 pm IST. )
2 / 10
आज सुपरमून, ब्लड मून आणि पूर्ण चंद्रग्रहणाची सर्व घटना एकत्रच होणार आहेत. ऑस्ट्रेलियातून या चंद्र ग्रहणाचे फोटो आले आहेत. पहा हे विलोभनिय फोटो....
3 / 10
या चंद्र ग्रहणावरून लोकांच्या मनात वेगवेगळ्या शंका आहेत. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येते का? नासानुसार या चंद्र ग्रहणाला पाहणे पूर्णपणे सुरुक्षित आहे.
4 / 10
हे ग्रहण पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशिष्ट उपकरणाची किंवा टेलिस्कोपची गरज नाही. ऑस्ट्रेलियातील या फोटोंमध्ये चंद्र खूप सुंदर दिसत आहे.
5 / 10
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीमागे पूर्णपणे झाकला जाईल, तेव्हा यावर सूर्याचा प्रकाश पडणार नाही. तरीही चंद्र काळा पडणार नाही. तर तो लाल रंगात दिसणार आहे. यामुळे अशा चंद्राला ब्लड मून असे म्हणतात.
6 / 10
जेव्हा चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्र ग्रहण होते. चंद्र आपल्या कक्षेत पाच डिग्री झुकलेला असणार आहे. यामुळे तो फुल मून म्हणजेच पृथ्वीच्या सावलीच्या थोडासा वर राहतो किंवा खाली. चंद्र त्याच्या कक्षेमध्ये दोनवेळा अशा स्थितीत असतो जेव्हा सूर्य, पृथ्वी णि चंद्र सरळ रेषेत असतात. असे झाल्य़ास त्यास पूर्ण चंद्र ग्रहण म्हणतात.
7 / 10
फोटो ग्राफरनी अफलातून फोटो टिपले आहेत. एका फोटोत चंद्र बुडताना दिसत आहे.
8 / 10
भारतात हे ग्रहण दिसणार नाही, मात्र जगभरातील फोटोंद्वारे ते डोळ्यात साठवू शकता.
9 / 10
दुपारी 2.17 ला हे ग्रहण सुरु झाले आहे. भारतात अंधार होताना काहीसे हे ग्रहण दिसेल.
10 / 10
बेल्जिअममधून ब्लड मूनचा फोटो आला आहे.
टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहण