बापरे! चीनकडून कोरोनाच्या पुराव्यांची लपवाछपवी? लॅबमधील रिसर्चचा महत्त्वाचा ऑनलाईन डेटा उडवला By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 2:33 PM1 / 15चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यासोबतच बिजिंगमध्ये होणाऱ्या सर्व राजकीय परिषद रद्द करण्यात आल्या आहेत. 2 / 15बिजिंगच्या दक्षिणेला असलेल्या शहरातील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील सात दिवसांसाठी प्रशासनाकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. वुहान प्रांतातही अनेक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. 3 / 15कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र अद्याप कोरोनाचा व्हायरस सर्वप्रथम नेमका कोठे सापडला आणि त्याचा प्रसार कसा झाला याबाबतची खरी माहिती अद्याप समोर आलेली नाही. 4 / 15कोरोना व्हायरसची माहिती लपवण्याबाबत चीनवर सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता आणखी एक धक्कादायक दावा करण्यात येत आहे. वुहान येथील वायरॉलजी लॅबशी निगडीत असलेला महत्त्वाचा ऑनलाईन डेटा डिलीट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.5 / 15'डेली मेल' दिलेल्या वृत्तानुसार, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलजीमध्ये करण्यात येणाऱ्या संशोधनाशी निगडीत असलेल्या जवळपास शेकडो पानांची माहिती आता डिलीट करण्यात आली आहे. 6 / 15नॅशनल नॅचरल सायन्स फाउंडेशन ऑफ चायना (NSFC)ने जवळपास 300 हून अधिक संशोधन अभ्यास प्रकाशित केले होते. यामध्ये प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या आजारांबाबत संशोधन करण्यात आले. आता हे संशोधन, अभ्यास आता उपलब्ध नाही. त्यामुळेच चीनवर कोरोनाचा उगमस्थान लपवण्याचा आरोप पुन्हा एकदा करण्यात येत आहे.7 / 15NSFC च्या ऑनलाईन संशोधन, अभ्यासाचा डेटा डिलीट करण्यात आला आहे. त्यामध्ये वुहानची वायरॉलजिस्ट शी झेंगलीच्या संशोधनाचा समावेश आहे. झेंगली यांना बॅटवुमन म्हणून ओळखले जाते. 8 / 15वटवाघळांच्या गुहेत जाऊन त्यांनी अनेकदा नमुने जमा केले आहेत. त्यांचे संशोधनही डिलीट करण्यात आले आहे. हे संशोधन वटवाघळांपासून दुसऱ्या प्राण्यांमध्ये Sars सारखा कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका यावर अभ्यास करण्यात आला होता.9 / 15चीनने कोरोना व्हायरसबाबत गांभीर्य दाखवलेलं नाही आणि तसेच संपूर्ण जगाला अंधारात ठेवल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला असल्याचा आरोप चीनवर करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 15कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान चीनमधीलच शास्त्रज्ञ आणि डॉक्टरने चीनी सरकारची आता पोलखोल केली आहे. चीनची कोरोना लस जगातील सर्वात असुरक्षित लस असल्याचं समोर आलं आहे.11 / 15चीनमधील एका डॉक्टरने कोरोना लसीबाबत धक्कादायक दावा केला आहे. डॉक्टर ताओ लिना (Tao Lina) यांनी 'चीनमध्ये तयार झालेली साइनोफार्माची कोरोना लस (Sinopharm COVID-19 vaccine) जगातील सर्वात असुरक्षित लस आहे' असं म्हटलं आहे.12 / 15'कोरोना लसीमुळे 73 पेक्षाही जास्त साईड इफेक्ट होण्याची शक्यता आले. या लसीचं ट्रायल पूर्ण झालं नाही आणि याचे धक्कादायक दुष्परिणाम आहेत' असं देखील चीनमधील डॉक्टरांनी म्हटलं आहे.13 / 15डॉ. ताओ यांनी कोरोना लसीबाबत ब्लॉग लिहिला आहे. हा ब्लॉग चीनी सोशल मीडिया साईट वीबोवर अपलोड केला होता. त्यांचा हा लेखही आता हटवण्यात आला आहे आणि त्याचं कारणही दिलेलं नाही.14 / 15ताओ यांनी पोस्टमध्ये चीनी लसीचं इंजेक्शन घेताच डोकेदुखी, वेदना, हाय ब्लड प्रेशर, डोळ्यांनी नीट न दिसणं, तोडांची चव जाणं, वारंवार लघवी होणं असे 73 दुष्परिणाम होऊ शकतात असं म्हटलं आहे.15 / 15कोरोना लस 79.34 टक्के प्रभावी असल्याचा दावा चीननं केला आहे. चीनने नववर्षाच्या आधी म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही लस दिली जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांचं सर्वात आधी लसीकरण केलं जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications