शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: ...अन् चीननं मारली पलटी; कोरोना आणि वुहानबद्दल दिली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 3:21 PM

1 / 13
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास पावणे चार लोकांचा जीव गेला आहे. तर ६० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
2 / 13
चीनच्या वुहानमधून कोरोचा फैलाव झाल्याचं चीन सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र प्राण्यांच्या मांसाची विक्री करणाऱ्या एका बाजारातून कोरोना पसरला यावर जगभरात कोणाचाही विश्वास बसला नाही.
3 / 13
चीनच्या वुहान बाजाराच्या कहाणीवर फारसा कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यामुळेच कोरोनाचा फैलाव नेमका कुठून झाला, याची आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी होऊ लागली.
4 / 13
कोरोना प्रकरणाच्या चौकशीला चीन सहकार्य करेल. मात्र ती निष्पक्ष असावी, त्यावर कोणाचाही दबाव नसावा, अशी भूमिका चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मांडली.
5 / 13
वुहानमधल्या बाजारातून कोरोनाचा फैलाव झाला, असं चीन आतापर्यंत सातत्यानं सांगत होता. मात्र आता चीननं मोठा यू-टर्न घेतला आहे.
6 / 13
चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक गाओ फू यांनी वुहानच्या बाजारातून कोरोना पसरला नसल्याचं म्हटलं आहे. ग्लोबल टाईम्सनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
7 / 13
'प्राण्यांच्या मांसामध्ये विषाणू असू शकतं, असं आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं. मात्र वुहानच्या बाजाराला विनाकारण व्हिलन करण्यात आल्याचं आम्हाला कळतंय. कोरोना विषाणू आधीपासूनच अस्तित्वात होता,' असं गाओ फू म्हणाले.
8 / 13
जानेवारीत आपण स्वत: वुहानला गेलो होतो. मात्र तिथल्या कोणत्याही प्राण्याच्या मांसाच्या नमुन्यात विषाणू सापडला नाही, असं गाओ फू यांनी सांगितलं.
9 / 13
कोरोना विषाणूची उत्पत्ती नेमकी कुठून झाली, याचा शोध घेण्यासाठी चीनचे संशोधक काम करत असल्याचं फू म्हणाले.
10 / 13
विशेष म्हणजे कोरोना विषाणू वुहानच्या बाजारातून पसरला, यावर अमेरिकेसह जगातल्या कोणत्याच राष्ट्रानं कधीही विश्वास ठेवलेला नाही.
11 / 13
वुहानच्या बाजारापासून काही अंतरावरच वुहान व्हायरॉलॉजी इंस्टिट्यूट आहे. तिथूनच कोरोना विषाणू पसरला, असा संशय संपूर्ण जगाला आहे.
12 / 13
चीनबद्दल संशय वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे वुहानमधल्या मांस विक्री बाजारातून कोरोना विषाणू पसरल्याचा दावा केल्यानंतर चीननं कधीही त्या मांसाचे नमुने जगाला दाखवलेले नाहीत.
13 / 13
वुहानच्या बाजारातून कोरोना पसरला, इतकीच माहिती चीननं जगाला दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासनानं बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन