China alleges that US has spread the alien virus in China
अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:41 PM1 / 11कोरोना विषाणूच्या जगभरात झालेल्या संसर्गासाठी विविध देशांकडून सध्या चीनला जबाबदार धरण्यात येत आहे. त्यातच कोरोनाचा सर्वाधिक फैलाव हा अमेरिकेत झाल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता चीननेही अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. 2 / 11 अमेरिकेने चीनमध्ये एलियन प्रजाती पसरवल्या असून, त्यामुळे देशातील पर्यावरण, इकॉलॉजी आणि जीवजंतूंचा -हास होत आहे, असा आरोप चीनने केला आहे. या एलियन प्रजाती विषाणूच्या आहेत. त्या पिकांचे नुकसान करत आहेत, असाही आरोप चीनने केला आहे. 3 / 11 चीनच्या पर्यावरण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या नानजिंग इंस्टीट्युट अॉफ एन्व्हार्यमेंटल सायन्सचे कसोसिएट रीसर्चर मा फांगझोऊ यांनी सांगितले की, चीनमध्ये ६६० इन्वेसिव्ह एलियन स्पीसीज म्हणजेच आक्रमक एलियन प्रजातींचा शोध लागला आहे. यापैकी ७१ प्रजाती खूप धोकादायक आहेत. तसेच त्यांच्यामुळे चीनच्या स्थानिक प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. 4 / 11या ६६० इन्वेसिव्ह एलियन प्रजातींपैकी सुमारे ५१ टक्के प्रजाती ह्या अमेरिकेतून चीनमध्ये पोहोचल्या आहेत. त्यांच्यामुळे चीनमधील पर्यावरण, इकॉलॉजी आणि प्राणिमात्रांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे, असा दावा मा फांगझोऊ यांनी केला आहे. 5 / 11 या प्रजाती चीनमध्ये आंतरराष्ट्रीय मार्गाने पोहोचल्या आहेत. यातील पोपलर मोजेक विषाणू ही सर्वात धोकादायक असून, त्यामुळे पिके खराब होत आहेत. हा विषाणू अमेरिकेतून बियाणी आणि रोपट्यांच्या कटिंग्समधून पोहोचला आहे, असा दावा फांगझोऊ यांनी केला. 6 / 11 अशा प्रकारच्या आक्रमक एलियन प्रजाती ह्या धान्य, तेल कार्गो किंवा सामानाच्या माध्यमातून पोहोचतात. त्यानंतर त्या तेथील वातावरणाशी जुळवून घेत विकसित होतात. किंवा प्रतिकूल वातावरणामुळे नष्ट होतात. मात्र चीनने या विषाणूंसाठी अमेरिकेला दोष देत एक नवा डाव खेळला आहे. 7 / 11चीनमध्ये राईस ग्रास प्रजातीचा एलियन प्रजातीमध्ये समावेश होतो. ही जात किनारी भागात वेगाने विस्तारत आहे. मात्र तिचा चीनशी काहीच संबंध नाही. ती अमेरिकेतून कोणत्यातरी माध्यमातून चीनमध्ये आली आहे, असे फांगझोऊ सांगतात. 8 / 11इन्वेसिव्ह एलियन प्रजातींमुळे स्थानिक प्रजाती, पिके आणि जीवजंतूंसोबतच माणसांवरही परिणाम होतो. त्यांच्यामुळे स्थानिक पर्यावरणावर खूप परिणाम होतो, असा दावाही फांगझोऊ यांनी केला. 9 / 11चीनच्या दक्षिण पूर्व तटावर बाहेरून आलेली मायक्रोएल्जी आणि सी-बीन्स चीनमधील स्थानिक मँग्रुव्हस हँलाफाइटला नष्ट करत आहेत. मायक्रोएल्जी आणि सी-बीन्स वेगाने पसरत असून, त्यांनी मँग्रुव्हसच्या डीएनएमध्येही बदल घडवून आणला आहे. 10 / 11आम्ही जो सर्वे केला आहे त्यामध्ये २१५ इन्वेसिव्ह एलियन प्रजाती चीनच्या ६७ नँशनल रिझर्व्हमध्ये पसरले असल्याचे दिसून आले आहे. 11 / 11यामधील ४८चा समावेश इन्वेसिव्ह एलियन प्रजातींच्या इन्व्हेंटरी लिस्टमध्ये करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications