शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

China Corona: बापरे...! चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी डॉक्युमेन्ट लीक; उडाला एकच गोंधळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 6:50 PM

1 / 8
चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. यासंदर्भात लीक झालेल्या सरकारी कागदपत्रांचा हवाला देत, शून्य कोविड धोरण सैल झाल्यानंतर, केवळ 20 दिवसांतच चीनमध्ये तब्बल 25 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा रेडिओ फ्री एशियाने केला आहे.
2 / 8
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या 20 मिनिटांच्या बैठकीत लीक झालेल्या या दस्तएवजानुसार, 1 ते 20 डिसेंबरदरम्यान 24.8 कोटी लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. चीनच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता हा आकडा 17.65 टक्के एवढा आहे.
3 / 8
रेडिओ फ्री एशिया म्हटल्यानुसार, 20 डिसेंबरला सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले करोना बाधितांचे आकडे, खरे नाहीत. एका वरिष्ठ चिनी पत्रकाराने गुरुवारी रेडिओ फ्री एशियासोबत बोलताना सांगितले, की दस्तएवज खरे होते आणि ते बैठकीत सहभागी झालेल्या अशा व्यक्तीने लिक केले, जी जाणूनबुजून आणि सार्वजनिक हितासाठी काम करत होती. हे नवे आकडे समोर आल्यानंतर गोंधळ उडाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक नियम तयार केले जात आहेत.
4 / 8
तत्पूर्वी शनिवारी, अधिकृत आकडेवारीचा हवाला देत, 3,761 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एकही नवा मृत्यू नाही, असे चीनने म्हटले होते. महत्वाचे म्हणजे, ब्रिटिनमधील हेल्थ डेटा फर्म एअरफिनिटीने, चीनमध्ये कोरोना संसर्गाचा रोजचा आकडा 10 लाखहून अधिक आणि मृतांचा आकडा 5,000 हून अधिक असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. असे असतानाच हा अहवाल समोर आला आहे.
5 / 8
एअरफिनिटीच्या नव्या मॉडेलने चीनमधील काही प्रांतांमधील डेटा तपासला आहे. काही बागात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. बिजिंग आणि ग्वांगडोंगमध्ये मोठ्या प्रमाणेवर कोरोना बाधित समोर येत आहेत.
6 / 8
एका निवेदना एअरफिनिटीने म्हटले आहे की, 'प्रांतांमधील आकडेवारीनुसार, आमच्या टीमने, ज्या भागांत वेगाने कोरोना पसरत आहे, त्या भागांत सर्वप्रथम पीक येईल आणि नंतर इतर भागांत येईल, अशी शक्यता वर्तवली आहे.''
7 / 8
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, एअरफिनिटी मॉडेलचा अंदाज आहे, की जानेवारी 2023 मध्ये संसर्गाचा दर पीकवर 3.7 मिलियन आणि मार्च 2023 मध्ये एका दिवसात 4.2 मिलियनपर्यंत पोहोचू शकतो.
8 / 8
एअरफिनिटीमध्ये व्हॅक्सीन आणि अॅपिडेमोलॉजीचे प्रमुख डॉ. लूईस ब्लेअर यांनी म्हटल्यानुसार, चीन मोठ्या प्रमाणावर टेस्टींगही करत नाहीय आणि लक्षण नसलेल्या कोरोना बाधितांची मोजणीही करत नाहीय. यामुळे देशात प्रत्यक्षात जेवढे कोरोना रुग्ण आहेत, त्या तुलनेत आकडे वेगळे आणि कमी येत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसchinaचीनhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य