china corona hospitals overwhelmed like india deaths likely in millions with covid 19
Corona Virus : भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट; रुग्णालयात मृतदेहांचे ढीग, ८० कोटी लोकांना धोका By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:22 PM1 / 10वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला असून परिस्थिती गंभीर आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी जशी स्थिती निर्माण झाली होती, त्याच प्रकारची स्थिती सध्या चीनमध्ये दिसून येत आहे. 2 / 10रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होत असल्याने अनेकांना जमिनीवर झोपावं लागत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन महिन्यांत म्हणजेच ९० दिवसांत चीनची ६० टक्के आणि जगभरातील १० टक्के लोकसंख्या कोरोनाने संक्रमित होऊ शकते. 3 / 10ही केवळ सुरुवात असून कोरोनाच्या संक्रमणामुळे २० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर, ८० कोटी लोक कोरोनाबाधित होऊ शकतात असंही म्हटलं आहे. विषाणू तज्ज्ञ एरिक फेइगल यांच्या मते, चीनची राजधानी बीजिंगमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. शवागृह भरली आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरची गरज असते. 4 / 10२००० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. ते म्हणाले की, २०२० ची परिस्थिती पुन्हा येत असल्याचे दिसते, परंतु यावेळी ते युरोपसह पाश्चात्य देशांमध्ये नाही तर चीनमध्ये घडत आहे. चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.5 / 10आता चीनची 60 टक्के लोकसंख्येला कोरोना संसर्गाचा धोका आहे. ईशान्य चीनमधील रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग आहे, परंतु सरकार ते लपविण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने सोमवारी कोविड-19 मुळे दोन नवीन मृत्यूची पुष्टी केली. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने (NHC) 3 डिसेंबरपासून श्वसनाच्या आजाराने कोणताही मृत्यू न झाल्याची नोंद केल्यानंतर अधिकृतपणे दोन मृत्यूची नोंद झाली आहे. 6 / 10स्मशानभूमीत कोविड पॉझिटिव्ह मृतदेह येण्याच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार रविवारी १३४४ जण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. चीनमधील वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार रविवारी दोघांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ५२३७ वर पोहोचली आहे.7 / 10चीनला कोरोना संसर्गामुळं डॉक्टरांची कमी जाणवत आहेत. बीजिंगच्या अनेक रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची देखील कमी जाणवत आहे. डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. छोट्या शहरांमध्ये देखील ही समस्या आढळून येत आहे. पुन्हा एकदा चीनने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 10कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी चीनने निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण चीनमध्ये वैद्यकीय पुरवठा ठप्प झाला आहे. औषधांच्या दुकानांसमोर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही दुकाने लोकांच्या गरजाही पूर्ण करू शकत नाहीत.9 / 10चीनमध्ये अशा स्थितीत लोकांमध्ये संतापाची नवी लाट पाहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की लोकांना औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी भटकावं लागत आहे. जिथे माल मिळतो तिथे किंमत ही सामान्य किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.10 / 10चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आठवड्यापूर्वी झिरो कोविड पॉलिसी शिथिल करण्यात आली होती, त्यानंतर आता प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, चीनची आरोग्य यंत्रणा रुळावरून घसरत आहे, ज्यामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications