Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी, ICU बेडची कमतरता By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 3:29 PM1 / 12चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली आहेत. झिरो कोविड पॉलिसीमध्ये दिलेली शिथिलता हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.2 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की राजधानी बीजिंगमध्ये कोविडची प्रकरणे वाढत आहेत कारण प्रशासनाने कोरोना निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 3 / 12कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनी बीजिंगच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांची गर्दी वाढली आहे. एएफपीच्या रिपोर्टमध्ये अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, यापूर्वी फक्त बीजिंग शहरात सुमारे 22 हजार रुग्णांची रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्याच वेळी, एका आठवड्यापूर्वी ही संख्या 16 पटीने कमी होती.4 / 12शहराच्या आरोग्य आयोगाचे प्रवक्ते ली आंग यांनी सोमवारी एका ब्रीफिंगमध्ये सांगितले की, बीजिंगमध्ये साथीच्या रोगाचा वेगवान प्रसार होण्याचा सध्याचा कल अजूनही अस्तित्वात आहे. ताप आणि फ्लू सदृश प्रकरणांनंतर क्लिनिकला भेट देण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि आपत्कालीन कॉलची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे.5 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी चीनमध्ये कोरोना व्हायरसची 8,622 प्रकरणे नोंदवली गेली. मात्र, कमी चाचणीमुळे हा आकडा खूप जास्त असल्याचे मानले जात आहे. येथे महत्त्वाची बाब म्हणजे झिरो कोविड पॉलिसी शिथिल केल्यानंतर आता किरकोळ लक्षणे असलेल्या अनेकांनी घरी उपचार करण्याचा पर्याय निवडला आहे.6 / 12आरोग्य सल्लागार झोंग यांनी चीन सरकारला कोरोना व्हायरसबाबत इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'सध्या ओमायक्रॉनचं म्यूटेशन खूप संसर्गजन्य आहे आणि एक व्यक्ती 22 लोकांपर्यंत व्हायरस प्रसारित करू शकते.' उच्च आरोग्य अधिकारी पुढे म्हणाले की, चीनमध्ये सध्या साथीचा रोग वेगाने पसरत आहे 7 / 12अशा परिस्थितीत, प्रतिबंध आणि नियंत्रण कितीही मजबूत असले तरीही, संक्रमण साखळी पूर्णपणे तोडणे कठीण होईल असंही त्यांनी म्हटलं. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या वैद्यकीय व्यवहार विभागाचे संचालक जिओ याहुई यांनी चेतावणी दिली की, देशात 10,000 लोकांसाठी फक्त एक अतिदक्षता युनिट बेड (ICU बेड) आहे. 8 / 12ते म्हणाले की 1,06,000 डॉक्टर आणि 1,77,700 नर्सना कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढीचा सामना करण्यासाठी आयसीयूमध्ये हलवले जाईल. तथापि, इतर रोगांवर उपचार करण्याच्या आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेवर याचा कसा परिणाम होईल हे त्यांनी सांगितले नाही. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 12कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी चीनने निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण चीनमध्ये वैद्यकीय पुरवठा ठप्प झाला आहे. औषधांच्या दुकानांसमोर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही दुकाने लोकांच्या गरजाही पूर्ण करू शकत नाहीत.10 / 12चीनमध्ये अशा स्थितीत लोकांमध्ये संतापाची नवी लाट पाहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की लोकांना औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी भटकावं लागत आहे. जिथे माल मिळतो तिथे किंमत ही सामान्य किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.11 / 12स्थानिक प्रशासनाने सौम्य किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करण्याची परवानगी दिली आहे. लोक आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पूर्वीपेक्षा सहजतेने जात आहेत. अशा स्थितीत आता औषधांचा तुटवडा दूर करून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर सरकारचे लक्ष आहे.12 / 12चीनचा दावा आहे की, लवकरच पुरवठा लाइनमधील समस्या दूर होईल. त्यामुळे लोकांच्या अडचणी कमी होऊन औषधांची उपलब्धता वाढेल. जनतेनेही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. चीनच्या अनेक शहरांमधील फार्मसीमध्ये लांब रांगा लागलेल्या लोकांना कफ सिरप, फ्लूचे औषध आणि मास्क खरेदी करायचे आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications