शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : परिस्थिती गंभीर! "चीनमध्ये कोरोनामुळे 10 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू"; धडकी भरवणारा रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 4:00 PM

1 / 12
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आठवड्यापूर्वी झिरो कोविड पॉलिसी शिथिल करण्यात आली होती, त्यानंतर आता प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, चीनची आरोग्य यंत्रणा रुळावरून घसरत आहे, ज्यामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे.
2 / 12
कोरोनाबाबत एक संशोधन समोर आलं आहे. रिसर्चचे सह-लेखक आणि हाँगकाँग विद्यापीठातील मेडिसिन विभागाचे माजी डीन ग्रेब्रियल लेउंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चीन सरकारने कोणत्याही बूस्टर लसीशिवाय कोरोनाचे नियम शिथिल केले आहेत. यामुळे सुमारे 10 लाख लोकांपैकी 684 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार आहे.'
3 / 12
नवा रिसर्च सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केला गेलेला नाही परंतु ब्लूमबर्गने याबाबत माहिती दिली. असा अंदाज आहे की चीनमध्ये 964,400 लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू होऊ शकतो. रिपोर्टनुसार, संशोधकांनी लिहिले की, 'आमचे निकाल असे सूचित करतात की डिसेंबर 2022-जानेवारी 2023 पर्यंत कोरोना नियम शिथिल केल्याने प्रकरणांमध्ये वाढ होईल'
4 / 12
'कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी मोठी वाढ होईल की सर्व प्रांतातील रुग्णालयांना प्रकरणे हाताळणे कठीण होईल.' असंही म्हटलं आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये घट होत आहे, याचे कारण चीनने अनिवार्य पीसीआर चाचणी रद्द केली आहे. इतकेच नाही तर मंगळवारपासून चीन सरकारने कोरोना प्रकरणांची घोषणा करणेही बंद केले आहे.
5 / 12
चीनमधील लोक आता कोरोनाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी इतर माध्यमांचा वापर करत आहेत. सोशल मीडियावर सर्च करून नवीन आकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंग आणि बाओडिंग आणि शिजियाझुआंगच्या आसपासच्या भागात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.
6 / 12
चीन सरकारने 7 डिसेंबर रोजी 10 कलमी नोटीस जारी केली होती, ज्यामध्ये कोरोना बाधितांना घरी क्वारंटाईन ठेवण्याचा पर्याय देण्यात आला होता. शहरांना सूचना देण्यात आल्या होत्या की ते लॉकडाऊन शिथिल करू शकतात. यासोबत पीसीआर चाचणी कमी करण्यास सांगितले.
7 / 12
बीजिंग म्युनिसिपल हेल्थ कमिशनचे प्रवक्ते ली आंग यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत 11 डिसेंबर रोजी तापावर उपचार घेणार्‍या लोकांची संख्या 22,000 होती, जी आठवड्यापूर्वीच्या पातळीच्या 16 पट जास्त होती. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 12
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. झिरो कोविड पॉलिसीमध्ये दिलेली शिथिलता हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
9 / 12
शहराच्या आरोग्य आयोगाचे प्रवक्ते ली आंग यांनी एका ब्रीफिंगमध्ये सांगितले की, बीजिंगमध्ये साथीच्या रोगाचा वेगवान प्रसार होण्याचा सध्याचा कल अजूनही अस्तित्वात आहे. ताप आणि फ्लू सदृश प्रकरणांनंतर क्लिनिकला भेट देण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि आपत्कालीन कॉलची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे.
10 / 12
आरोग्य सल्लागार झोंग यांनी चीन सरकारला कोरोना व्हायरसबाबत इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'सध्या ओमायक्रॉनचं म्यूटेशन खूप संसर्गजन्य आहे आणि एक व्यक्ती 22 लोकांपर्यंत व्हायरस प्रसारित करू शकते.' उच्च आरोग्य अधिकारी पुढे म्हणाले की, चीनमध्ये सध्या साथीचा रोग वेगाने पसरत आहे
11 / 12
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी चीनने निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण चीनमध्ये वैद्यकीय पुरवठा ठप्प झाला आहे. औषधांच्या दुकानांसमोर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही दुकाने लोकांच्या गरजाही पूर्ण करू शकत नाहीत.
12 / 12
चीनमध्ये अशा स्थितीत लोकांमध्ये संतापाची नवी लाट पाहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की लोकांना औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी भटकावं लागत आहे. जिथे माल मिळतो तिथे किंमत ही सामान्य किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या