China Corona Virus no information disclosure during covid 19 epidemic in china advisory to doctors
Corona Virus : भीषण! रस्त्यावर जळताहेत मृतदेह अन् कोरोनाचे 'सत्य' लपवण्यासाठी चीनचा डॉक्टरांवर दबाव By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 12:57 PM1 / 13जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाची आकडेवारी जगापासून लपवण्यासाठी चीन काहीही करण्यास तयार आहे. प्रथम त्याने दैनंदिन आकडेवारी शेअर करणे बंद केले. आता असे समोर आले आहे की, कोरोनाचे सत्य लपवण्यासाठी चीनने डॉक्टरांवरही दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. 2 / 13माहितीनुसार, मृत्यूचे कारण कोरोना व्हायरस म्हणून सूचीबद्ध करू नये यासाठी चीनमधील डॉक्टरांना सल्ला देण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार, बीजिंग रुग्णालयातील डॉक्टरांना मृत्यूचे प्राथमिक कारण म्हणून कोरोना व्हायरस संसर्ग असा रिपोर्ट करू नका असं सांगण्यात आलं आहे. 3 / 13चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि चीनमध्ये स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागल्याने लोकांना रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले जात असताना ही धक्कादायक बाब आता समोर आली आहे.4 / 13रिपोर्टनुसार, एका ग्रुप चॅट दरम्यान, डॉक्टरांना कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत इशारा देण्यात आला आहे. खरं तर, चीनमध्ये, ज्या लोकांना कोरोना झाला आहे आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मृत्यू होतो त्यांनाच कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यूचे कारण मानले जाते. 5 / 13आधीच अस्तित्वात असलेले आजार असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे कारण संसर्ग मानले जात नाही. परंतु नवीन सल्ल्यानुसार, डॉक्टरांना मृत्यू प्रमाणपत्रांवर मृत्यूचे प्राथमिक कारण म्हणून श्वसनक्रिया बंद होणे हे नमूद करू नये असे सांगण्यात आले आहे. 6 / 13देशातील वाढत्या मृत्यूदरानंतरही चीनने कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारी 5000 पेक्षा थोडी जास्त ठेवली आहे. याच दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने चीनवर रूग्णालयात दाखल रुग्ण, कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा आरोप केला आहे. 7 / 13पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबद्दल ते चिंतेत आहेत. ते म्हणाले, चीनमधून कोरोनाबाबतची आकडेवारी समोर येत नाहीय. हा डेटा WHO आणि जगासाठी उपयुक्त आहे आणि आम्ही सर्व देशांना तो शेअर करण्यास प्रोत्साहित करतो. 8 / 13WHO चे आपत्कालीन संचालक माइक रायन यांनी चिनी अधिकाऱ्यांना कोरोनाबद्दल अधिक माहिती शेअर करण्यास सांगितले आहे. कोरोनामुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांनाच व्हायरसची लागण झाली असून औषधांचा देखील मोठा तुटवडा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 13चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे भारत, जपान, थायलंड व अमेरिका या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत चीनने तीन वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या सर्व सीमा खुल्या केल्या असून, बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाईनचा मोठा प्रोटोकॉलही रद्द केला आहे.10 / 13चीनने आंतरराष्ट्रीय पर्यटक व नववर्षासाठी मायदेशी येऊ इच्छिणाऱ्यांसाठी सीमा खुल्या केल्या असून, विलगीकरणाचे बंधनही हटवले आहे. चीनमध्ये चांद्र नववर्ष येत्या 21 जानेवारीपासून सुरू होणार आहे. चीनमध्ये कोरोना बळींची संख्या वाढत असून, लोकांचे मृतदेह ट्रकमध्ये भरून स्मशानभूमीत नेले जात आहेत. 11 / 13चिनी कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. चीनमध्ये कोविड टेस्ट किट बनवणाऱ्या फॅक्ट्रीमध्ये रविवारी हिंसाचार झाला. आंदोलकांनी पोलिसांवर औषधांचे बॉक्स फेकून मारले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लोक कामावरून काढून टाकल्यामुळे आणि पगार न मिळाल्याने संतापले होते. 12 / 13विरोध केल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले आणि त्यामुळे हिंसाचार झाला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चोंगकिंग शहरात कोविड टेस्ट किट बनवणाऱ्या जेबिओ कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि पगारही दिला नाही. कारखान्याबाहेर आंदोलकांची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट झाली. 13 / 13सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. आंदोलक औषधांचे रिकामे बॉक्स आणि स्टूल पोलिसांवर फेकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलीस धावताना दिसत आहेत. त्याने हेल्मेट आणि सुरक्षा उपकरणे परिधान केली आहेत. व्हिडिओमध्ये लोक घोषणाबाजी करताना ऐकू येतात. आमचे पैसे परत करा असं म्हणत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications