शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : भीषण! "चीनमधील 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण: 2 महिने असणार लाट"; रिसर्चमध्ये पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 10:15 AM

1 / 13
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आतापर्यत लाखो लोकांनी आपली जीव गमावला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार असून रुग्णांची संख्या मोठी आहे.
2 / 13
चीनमधील कोरोना व्हायरसच्या प्रकरणाबाबत एक हैराण करणारा रिसर्च समोर आला आहे. पेकिंग युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की 2 जानेवारीपर्यंत चीनमध्ये सुमारे 900 मिलियन लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, जी एकूण लोकसंख्येच्या सुमारे 64 टक्के आहे.
3 / 13
युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, चीनच्या गान्सू प्रांतातील 91 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर युनान आणि किन्हाई येथील अनुक्रमे 84 आणि 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
4 / 13
युनिव्हर्सिटीचा हा रिसर्च एका उच्च चिनी महामारी शास्त्रज्ञाने दिलेल्या चेतावणीनंतर केला आहे. ज्यामध्ये कोरोनाची प्रकरणे आता ग्रामीण भागात वाढतील आणि महामारीची ही लाट दोन ते तीन महिने टिकेल असा अंदाज आहे.
5 / 13
चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे माजी प्रमुख झेंग गुआंग यांनी लूनर न्यू ईयर आधी लाखो चिनी लोक त्यांच्या गावी प्रवास करत असताना हा इशारा दिला. ग्रामीण भागातील वृद्धांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे, असेही झेंगू म्हणाले.
6 / 13
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रामीण भागातील अनेक वृद्ध लोक आजारी आणि अपंग आहेत आणि त्यांना कोरोनामध्ये मिळणाऱ्या उपचारांमुळे ते मागे राहिले आहेत. चीनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोना व्हायरससाठी स्वीकारलेले शून्य-कोविड धोरण शिथिल केल्यानंतर प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे.
7 / 13
चीनमध्ये लूनर न्यू ईयरची सुट्टी अधिकृतपणे 21 जानेवारीपासून सुरू होते. सुट्टीमुळे लोकांचे त्यांच्या गावांमध्ये आणि घरांमध्ये जगातील सर्वात मोठे वार्षिक स्थलांतर देखील होते. या वर्षी जवळपास दोन अब्ज लोकांचा प्रवास अपेक्षित आहेत. लाखो लोकांनी आधीच प्रवास केला आहे.
8 / 13
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. रूग्णालयात रूग्णांसाठी जागा शिल्लक नाही. अगदी अंत्यसंस्कारासाठीही नंबर लावला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतटचे वृत्त दिले आहे. नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी रात्रभर वाट पाहावी लागत असून अनेक दिवसांचं वेटिंग देखील आहे.
9 / 13
चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कम्युनिस्ट पक्षाचे सरकार जगापासून कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवण्याच्या कामात व्यस्त आहे. पण सॅटेलाइट फोटोंमुळे त्यांची आता पोलखोल झाली. चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 7 डिसेंबर रोजी शून्य कोविड धोरण रद्द केल्यापासून कोरोनामुळे केवळ 40 लोकांचा मृत्यू झाला आहे.
10 / 13
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत केवळ 5,272 मृत्यू झाल्याचा दावा चीनने केला आहे. त्याच वेळी, ग्लोबल हेल्थ एनालिटिक्स फर्म एअरफिनिटीचा अंदाज आहे की 1 डिसेंबर 2022 नंतरच 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीननेही कोरोनामुळे मृत्यूची व्याख्या बदलली आहे.
11 / 13
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, चोंगकिंगमधील अंत्यसंस्कार गृहातील रिसेप्शनिस्ट थकल्यासारखे म्हणाला. फोन सतत वाजत राहतात. क्षणभरही फोनचे वाजणे थांबत नाही. मी गेली सहा वर्षे इथे काम करत आहे, पण इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच पाहिली.
12 / 13
हजारो लोकांसाठी क्वारंटाईन केंद्रे उभारण्यात आल्याचे सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये झिरो कोविड धोरणाबाबत निदर्शने होत होती. या निदर्शनांमुळे घाबरून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अचानक झिरो कोविड धोरण संपवण्याचा निर्णय घेतला.
13 / 13
चीनमधील मोठ्या लोकसंख्येला बूस्टर डोस घेतलेले नाहीत. यासोबतच बहुतांश लोकांची रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत असते. या व्हायरसपासून चिनी सेलिब्रिटीही सुटू शकलेले नाहीत. ऑपेरा स्टार चू लानलान यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. अज्ञात तापामुळे त्यांचा मृत्यू झाला
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या