शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये मृतदेहांसाठी कमी पडताहेत शवपेट्या; अंत्यसंस्काराचा खर्चही तिप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:33 AM

1 / 12
चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. येथील सुमारे 80 टक्के लोकसंख्या संसर्गाच्या विळख्यात आली असून मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. चीनमध्ये डिसेंबरपासून कोरोनामुळे 60,000 लोकांचा मृत्यू झाला असेल, परंतु वास्तव हे आहे की रस्त्यावर आणि रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह आहेत.
2 / 12
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी शवपेट्याही कमी पडल्या आहेत आणि मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. ग्रामीण भागात रोज कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत असल्याने स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा लागल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
3 / 12
चीनचे मुख्य महामारीशास्त्रज्ञ वू ज्युन्यो यांच्या मते, डिसेंबरमध्ये चीनने निर्बंध उठवल्यापासून एक अब्जाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, जे एकूण लोकसंख्येच्या 80 टक्के आहेत. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती आहे.
4 / 12
गेल्या आठवड्याच्या शेवटी, चीनमध्ये एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 13,000 कोरोना मृत्यूची नोंद झाली, परंतु हे मृत्यू रुग्णालयांमध्ये झाले. चीनच्या ग्रामीण भागाची अवस्था यापेक्षा खूपच वाईट असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
5 / 12
मीडिया रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा असा आहे की, चीनने शेअर केलेले मृत्यूचे आकडे फक्त शहरी भागातील आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने कोरोनामुळे मृत्यूची गणतीच होत नाही. अनेक अहवालांमध्ये ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढल्याची चर्चा आहे.
6 / 12
चीनच्या शांक्सी प्रांतातील ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण तीन ते चार पटीने वाढले आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांग लागली आहे. अशा परिस्थितीत शवपेटी बनवणारे आणि अंत्यसंस्कार उद्योगाशी संबंधित लोकांचे कामही वाढले आहे.
7 / 12
वाढलेल्या मागणीचा परिणाम भावावर झाला आहे. एका स्थानिक रहिवाशाचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येमुळे अंत्यसंस्काराचा खर्च गगनाला भिडला आहे. गेल्या एक महिन्यापासून येथे सातत्याने मृत्यू होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 12
चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दर आठवड्याला हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. हे सर्व असूनही चीन सतत आकडे लपवण्याचा आणि परिस्थिती सामान्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. डेटा लपवल्याबद्दल WHO ने चीनला अनेकदा फटकारले आहे. या सगळ्यामध्ये चीनमध्ये कोरोनाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
9 / 12
चीनने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कठोर झिरो कोविड पॉलिसी संपुष्टात आणली होती. हे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून लागू होते. चीनमध्ये कोविड पॉलिसीला खूप विरोध झाला, त्यामुळे जिनपिंग सरकारने झिरो कोविड पॉलिसी संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली.
10 / 12
चीनमधील कोरोनाच्या स्थितीबाबत डिसेंबरमध्ये एक धक्कादायक अहवाल समोर आला होता. येथे डिसेंबरमध्ये 20 दिवसांत 25 कोटी लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सरकारी कागदपत्रे लीक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रेडिओ फ्री एशियाने सोशल मीडियावर फिरत असलेल्या कागदपत्रांचा हवाला देत हे उघड केले की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'झिरो-कोविड पॉलिसी' शिथिल केल्यानंतर, परिस्थिती गंभीर बनली.
11 / 12
चीनच्या बीजिंग, अनसन आणि शांघायसारख्या मोठ्या शहरांमधून असे अनेक व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये विध्वंसाचे दृश्य स्पष्टपणे दिसत होते. या शहरांमधील रुग्णालयांमध्ये बेडच शिल्लक राहिले नाहीत. जमिनीवर पडून रुग्णांवर उपचार केले जात होते. एवढेच नाही तर स्मशानभूमीतही लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
12 / 12
चीनने 8 जानेवारीपासून आपल्या सीमा पूर्णपणे खुल्या केल्या आहेत. एवढेच नाही तर चीनमधून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे नियमही रद्द करण्यात आले आहेत. चीननेही कोरोनाच्या मृत्यूबाबतचे नियम बदलले आहेत. जेणेकरून कोरोनामुळे मृतांचा आकडा कमी राहील. चीनची सीमा खुली करण्याच्या घोषणेनंतर अमेरिका, भारत आणि युरोपातील सर्व देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली.
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या