china cracks fake covid 19 vaccine ring confiscates 3000 doses
बापरे! बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3000 डोस जप्त; 80 जणांना अटक By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 10:50 AM1 / 14जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून सर्वच देशांमध्ये संशोधन केलं जात आहे. एकूण रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. 2 / 14कोरोनाच्या संकटामुळे अनेक देशांमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा कठोर नियम लागू करण्यात येत आहेत. काही देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र या लसीचे काही साईड इफेक्ट्स देखील पाहायला मिळत आहेत.3 / 14कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये बनावट लस पुरवठा करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.4 / 14चीनच्या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी 80 हून अधिक जणांना अटक केली आहे. टोळीकडून तीन हजारांहून अधिक बनावट डोस जप्त करण्यात आले आहे. यामुळे तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे. 5 / 14चीनी वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, या टोळीकडून गेल्या सप्टेंबर महिन्यांपासून बनावट लसीचा पुरवठा सुरू होता. पोलीस या बनावट लसीच्या मागावर होते. अखेर या टोळीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आलं. 6 / 14ग्लोबल टाइम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये या बनावट लसी परदेशातही पोहचवण्याचा या टोळीचा प्रयत्न असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. पोलिसांनी बीजिंग, शांघाई, पूर्व प्रांतातील शानदोंगसह अनेक ठिकाणी छापेमारी केली. 7 / 14पोलिसांनी केलेल्या छापेमारीत तीन हजारांहून अधिक डोस जप्त करण्यात आले आहेत. तसेच 80 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. जगभरातील अनेक देश करोनाच्या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी लस विकसित करत असताना या घटनेने खळबळ उडाली आहे. 8 / 14चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.9 / 14पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. काही शहरांमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.10 / 14चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये 30 जानेवारी रोजी कोरोनाचे 92 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 जानेवारीनंतर एका दिवसात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे.11 / 14नव्या रुग्णांमध्ये 73 केसेस या लोकल ट्रान्समिशनच्या आहेत. जेलिन प्रांतातील टोंगुआ शहरात कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे बीजिंग आणि शांघाईमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळत आहे.12 / 14चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरस नेमका कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानमध्ये अन्य एका रुग्णालयाला भेट दिली.13 / 14पथकाने चीनच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली व कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार केलेल्या रुग्णालयाला भेट दिली. हे पथक आगामी काही दिवसांत वुहानमधील अनेक ठिकाणांना भेटी देणार आहे. या पथकात पशुवैद्यक, विषाणू विज्ञान, खाद्य सुरक्षा व महामारी विशेषज्ञ सहभागी आहेत.14 / 14जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर म्हटलं आहे की, हे पथक रुग्णालये, हुनान सीफूड मार्केट, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, तसेच वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या प्रयोगशाळेला आणि कोरोना व्हायरसशी संबंधित ठिकाणांना भेटी देणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications