शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : चीनची कोरोनावरील लस डिसेंबरपर्यंत बाजारात येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 5:29 PM

1 / 17
रशियानंतर आता चीनने कोरोना विषाणूच्या लसीसंदर्भआत आनंदाची बातमी दिली आहे. ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार, फार्मा कंपनी सिनोफर्मने (Sinopharm) तयार केलेली ही लस डिसेंबर अखेरीस सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होईल.
2 / 17
या लसीची किंमत दोन डोससाठी 1000 युआनपेक्षा (10780 रुपये) कमी निश्चित केली गेली आहे. तसेच, ही लस बाजारात आल्यानंतर किंमत आणखी कमी होईल, असे सांगण्यात येत आहे.
3 / 17
लसीच्या तिसरा टप्प्यातील क्लिनिकल चाचणी पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भात वितरण आढावा घेतला जाईल, असे चीनच्या नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुपचे (सिनोफार्म) अध्यक्ष लियू जिंगजेन यांनी सांगितले.
4 / 17
या लसीच्या दोन डोसची किंमत 1000 युआनपेक्षा कमी असेल. ही लस चीनमधील सर्व नागरिकांना दिली जाणार नाही, असे लियू जिंगजेन यांनी म्हटले आहे.
5 / 17
लियू जिंगजेन म्हणाले, विद्यार्थ्यांनी आणि शहरांमध्ये राहणाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे, तर लहान लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना ही लस घेण्याची गरज नाही.
6 / 17
बीजिंग आणि वुहानमध्ये सिनोफार्माच्या दोन वेगवेगळ्या लस तयार केल्या जात आहेत. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी जून महिन्यात ही लस युएईला पाठविण्यात आली होती.
7 / 17
लियू जिंगजेन यांनी स्वत: या दोन लसींपैकी एक लसीचे दोन डोस घेतले आहेत. लियू जिंगजेन म्हणाले, ' मला त्याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. बीजिंगमध्ये या लसीचे 120 दशलक्ष डोस तयार करण्याची तयारी सुरू आहे.'
8 / 17
दरम्यान, यापूर्वी रोगप्रतिकारक प्रतिक्रियेच्या चाचणीत त्यांच्या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत, असे दावा सिनोफर्म कंपनीने केला आहे.
9 / 17
सिनोफार्मच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये याची सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती वाढवून अँटीबॉडी तयार करण्याचे प्रमाण मिळाले आहे. अहवालानुसार नियामक मंजुरीसाठी आता याची चाचणी अॅडव्हान्स लेव्हलवर केली जाईल.
10 / 17
यापूर्वी, चीनची कॅनसिनो कंपनीची कोरोना लस Ad5-nCoV ला पेटंट प्राप्त झाले आहे. कोरोना व्हायरस लसीसाठी पेटंट मिळवणारी कॅनसिनो ही चिनीमधील पहिली कंपनी आहे.
11 / 17
चीनच्या लसीची क्लिनिकल चाचणी पाकिस्तानमध्ये देखील केली जाईल. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी अहवाल दिला की, चीनच्या कॅनसिनोबायो आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीने तयार केलेल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचणीस मान्यता मिळाली आहे.
12 / 17
चीन, रशिया, चिली, अर्जेंटिना आणि सौदी अरेबियामध्ये कॅनसिनोबायोच्या क्लिनिकल चाचण्या आधीच सुरू आहेत. पाकिस्तानने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही क्लिनिकल चाचणी एनआयएचचे कार्यकारी संचालक मेजर जनरल आमेर इकराम यांच्या देखरेखीखाली होईल.
13 / 17
पाकिस्तानच्या एजेएम फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदनान हुसेन यांनी या लसीच्या क्लिनिकल चाचणीसंदर्भातील करारावर स्वाक्षरी केली आहे. पाकिस्तान आरोग्य संशोधन परिषदेच्या नॅशनल बायोएथिक्स कमिटीने क्लिनिकल ट्रायल्सच्या चाचणीला मान्यता दिली आहे.
14 / 17
दरम्यान, रशियाने स्पुतनिक व्ही ही कोरोनावरील पहिली लस देखील सुरू केली आहे. रशियाचा असा दावा आहे की, 20 देशांनी ही लस घेण्यास स्वारस्य दाखविले आहे. स्पुतनिक व्ही कोरोनावरील जगातील पहिली नोंदणीकृत लस बनली आहे.
15 / 17
वेबसाइटनुसार, रशियाने या वर्षाच्या अखेरीस या लसीचे 20 कोटी डोस उत्पादन करण्याची योजना आखली आहे. सप्टेंबरमध्ये या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
16 / 17
यासह, रशियाला भारत, सौदी अरेबिया, युएई, ब्राझील आणि फिलिपिन्स यासह अनेक देशांमध्ये आपल्या लसीच्या तिसर्‍या टप्प्याची चाचणी घ्यायची आहे.
17 / 17
कोरोनावरील लस या वर्षाच्या अखेरीस येऊ शकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. ब्रिटन, अमेरिका आणि चीन या लसीच्या शर्यतीत अग्रेसर आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यrussiaरशिया