शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इरादा पक्का, दे धक्का! भारताचा शक्तिशाली ड्रॅगनला दणका; थेट शक्तीस्थळावरच प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 6:35 PM

1 / 9
भारतात व्यापार करून, उत्पादनांची मोठी निर्यात करून, त्याच माध्यमातून मिळवलेल्या आर्थिक ताकदीतून सीमेवर भारताविरोधात कारवाया करणाऱ्या चीनला मोठा दणका बसला आहे. चीनच्या शक्तीस्थळावरच सध्या मोठा आघात झाला आहे. त्यामुळे चीन चिंतेत आहे.
2 / 9
भारत चीनसाठी मोठी बाजारपेठ आहे. चीनमध्ये तयार होणारी उत्पादनं मोठ्या प्रमाणात भारतात येतात. मात्र गेल्या काही महिन्यांत भारतानं चीनला मोठा झटका दिला आहे.
3 / 9
चीनकडून होणारी निर्यात गेल्या काही महिन्यांत कमी झाली आहे. भारतानं चीनवर असलेलं अवलंबित्व कमी केलं आहे. त्याचा मोठा फटका चीनला बसला आहे. चीनच्या आर्थिक स्थितीवर याचा प्रतिकूल परिणाम दिसत आहे.
4 / 9
भारतासोबतच जगभरातून चिनी मालाला असलेली मागणी कमी झाली आहे. त्यामुळे चीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मंगळवारी याबद्दलची एक आकडेवारी प्रसिद्ध झाली. उत्पादनाशी संबंधित घडामोडींवर गंभीर परिणाम झाल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
5 / 9
चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत चीनची निर्यात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. याशिवाय जुलैमध्ये आलेल्या पुरामुळे चीनच्या उत्पादन उद्योगावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा फटकादेखील उत्पादनाला बसला आहे.
6 / 9
चिनी उत्पादनांना असलेली मागणी घटली असून हीच परिस्थिती कायम राहण्याचा सीआयसीसीचा अंदाज आहे. सीआयसीसी चीनमधील गुंतवणूक बँक आहे. पुढील काही महिनेदेखील निर्यातीच्या आघाडीवर चीनला धक्के बसणार अशी शक्यता बँकेनं वर्तवली आहे.
7 / 9
जुलैमध्ये चीनची आयात आणि निर्यात वाढली होती. मात्र निर्यातीचा वेग कमी झाला. गेल्या जुलैच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये चीनची निर्यात १८.९ टक्क्यांनी वाढली. मात्र गेल्या काही महिन्यांतील आकडेवारी पाहता त्यात घट झाली आहे.
8 / 9
चिनी कंपन्यांचे मोबाईल भारतात मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. गेल्या काही वर्षांत चीननं भारतीय मोबाईल बाजारपेठेत सुसाट आघाडी घेतली. मात्र आता भारत याच क्षेत्रात चीनला टक्कर देत आहे.
9 / 9
मोदी सरकारनं प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह स्कीम आणल्यानं उत्पादन क्षेत्राला चालना मिळाली आहे. त्यामुळे मोबाईल पोन निर्यात २५० टक्क्यांनी वाढली आहे. मोबाईल निर्मिती क्षेत्रात आता भारतानं चीन पाठोपाठ दुसरा क्रमांक मिळवला आहे.
टॅग्स :chinaचीन