China First New Levitating Train, No Sound Know Full Detail Of Magnet Train
आश्चर्यकारक! चीनमध्ये पहिल्यांदाच धावली हवेत लटकणारी ट्रेन; जाणून घ्या वैशिष्टे By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 8:54 PM1 / 5चीन पुन्हा एकदा त्यांच्याकडील ट्रेनमुळे चर्चेत आला आहे. पण यावेळी चीन भविष्यातील मॅग्लेव्ह ट्रेनमुळे चर्चेत आहे. या हायस्पीड ट्रेन ट्रॅकवर इलेक्ट्रोमॅग्नेटवर धावतात. चीनने देशातील पहिली एअर हँगिंग ट्रेन लाइन सुरू केली आहे जी मॅग्नेटपासून बनलेली आहे. याला रेड रेल असेही म्हणतात. 2 / 5ही ट्रेन प्रायोगिक प्रकल्प असून २६०० फूट लांबीचा ट्रॅक आहे. ही चीनच्या जिआंग्शी प्रांतातील जिंगगुओ काउंटीमध्ये बनवली गेली. चीनच्या सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सने ट्रेनचा फोटो प्रसिद्ध केला आहे. ट्रेनचे चुंबक एक शक्ती निर्माण करतात, ज्यामुळे ट्रेन हवेत वर येते. 3 / 5या ट्रेनमध्ये फक्त ८८ प्रवासी प्रवास करू शकतात. ही ट्रेन जमिनीपासून सुमारे ३३ फूट उंचीवर धावते. तिचा ट्रॅकशी संपर्क नाही. या ट्रेनची खास गोष्ट म्हणजे ती धावते तेव्हा आवाज येत नाही. ट्रेनचा वेग ८० किमी प्रतितास आहे, पण ती कधी धावत असतानाही कोणालाच कळत नाही.4 / 5अहवालानुसार, ही ट्रेन पारंपारिक ट्रेनपेक्षा खूपच कमी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तयार करते. याशिवाय ही बनवण्याची किंमतही कमी आहे. तथापि, चीनमध्ये या तंत्रज्ञानाच्या यशामागे पृथ्वीवरील दुर्मिळ घटकाचं योगदान आहे. जे अशा ट्रेन मॅग्नेट तयार करण्यास मदत करतात. चीनमध्ये जगातील ४० टक्के दुर्मिळ घटकांचा साठा आहे.5 / 5चीनमध्ये हाय स्पीड रेलचे (एचएसआर) सर्वात मोठे नेटवर्क आहे जे ४० हजार किमीपेक्षा जास्त आहे. हायस्पीड रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या गाड्यांची गती २००-३५० किमी प्रतितास आहे. जगातील एकूण हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कपैकी दोन तृतीयांश चीनच्या HSR चा वाटा आहे. सर्व HSR गाड्या चायना रेल्वे कॉर्पोरेशनच्या मालकीच्या आहेत. सन २००० पासून, चीनमध्ये हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क वेगाने विकसित झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications