China first unmanned helicopter maiden flight spy mission along border with India api
चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर, भारताविरोधात असा करणार वापर! By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:42 PM1 / 15कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश एकीकडे आणि चीन एकीकडे असं चित्र बघायला मिळत आहे. अशातच चीनने त्यांचं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर (Unmanned Helicopter) तयार केलं आहे. हे हेलिकॉप्टर खासकरून पठारी भागांमध्ये गुप्तहेरी करेल. 2 / 15चीनच्या मीडियाने दावा केला आहे की, हे अत्याधुनिक मानवरहित हेलिकॉप्टर भारताशी जुळलेल्या सर्व सीमांवर तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून चीन आकाशातूनही सीमांवर लक्ष देऊ शकेल.3 / 15या मानवरहित हेलिकॉप्टरचं नाव AR500C आहे. हे चीनची सरकारी कंपनी एविएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने तया केलं आहे. कंपनीने पूर्व चीनच्या जियांसी प्रांतातील पोयांगमध्ये पहिल्यांदा याची ट्रायल घेतली. ही ट्रायल यशस्वी ठरली.4 / 15चीनमधील वेबसाइट ग्लोबल टाइम्सनुसार, या मनवरहित हेलिकॉप्टरचा उपयोग भारतीय सीमा भागावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. 5 / 15यात शस्त्रास्त्रे लावली गेली तर हे हेलिकॉप्टर हल्लाही करू शकतं. कार्गो डिलीव्हरी करू शकतो. तसेच शत्रूच्या टार्गेटची ओळख पटवण्यातही हे सक्षम आहे. तसेच हे हेलिकॉप्टर परमाणू आणि रासयनिक लिकेजची देखील माहिती देतं.6 / 15हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 6700 मीटर म्हणजे 21981 फूट उंचीपर्यत उड्डाण घेऊ शकतं. याची जास्तीत जास्त गति 170 किलोमीटर प्रतिसात आहे. तर याचं वजन 500 किलोग्रॅम आहे.7 / 15AVIC टेक्नॉलॉजी डिरेक्टर आणि हे हेलिकॉप्टर तयार करणारे सायंटिस्ट फॅंग योगंहोंग यांनी सांगितले की, हे मानवरहित हेलिकॉप्टर पूर्णपणे डिजिटल आहे. हे आपोआप टेकऑफ आणि लॅंडिंग करू शकतं.8 / 15हे चीनचं पहिलं हेलिकॉप्टर पठारी परिसरांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.9 / 15फॅंग योंगहोंग यांनी सांगितले की, आम्ही या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली. यात चीनमधील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तीशाली इंजिन लावण्यात आलं आहे.10 / 15चीनचे सुरक्षा तज्ज्ञ फू क्विनशाओ यांनी सांगितले की, पठारी भागांमध्ये फार खाली विमान किंवा हेलिकॉप्टर उडवणं फार कठीण होतं. अशा स्थितीत मानवरहित हेलिकॉप्टर फार फायदेशीर ठरेल.11 / 15फू क्विनशाओ म्हणाले की, आता चीन आणि भारत यांच्या सीमावाद सुरू आहे. अशात चीन सरकार या हेलिकॉप्टरच्या मदतीने सीमेवर लक्ष ठेवू शकतो. याने लडाखमधील गालवान घाटातील परिसावरही लक्ष ठेवता येईल.12 / 15फू क्विनशाओ म्हणाले की, आता चीन आणि भारत यांच्या सीमावाद सुरू आहे. अशात चीन सरकार या हेलिकॉप्टरच्या मदतीने सीमेवर लक्ष ठेवू शकतो. याने लडाखमधील गालवान घाटातील परिसावरही लक्ष ठेवता येईल.13 / 15फू क्विनशाओ म्हणाले की, आता चीन आणि भारत यांच्या सीमावाद सुरू आहे. अशात चीन सरकार या हेलिकॉप्टरच्या मदतीने सीमेवर लक्ष ठेवू शकतो. याने लडाखमधील गालवान घाटातील परिसावरही लक्ष ठेवता येईल.14 / 15फू क्विनशाओ म्हणाले की, आता चीन आणि भारत यांच्या सीमावाद सुरू आहे. अशात चीन सरकार या हेलिकॉप्टरच्या मदतीने सीमेवर लक्ष ठेवू शकतो. याने लडाखमधील गालवान घाटातील परिसावरही लक्ष ठेवता येईल.15 / 15फू क्विनशाओ म्हणाले की, आता चीन आणि भारत यांच्या सीमावाद सुरू आहे. अशात चीन सरकार या हेलिकॉप्टरच्या मदतीने सीमेवर लक्ष ठेवू शकतो. याने लडाखमधील गालवान घाटातील परिसावरही लक्ष ठेवता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications