China got big shock in 1949; after that Naval development only because of Taiwan hrb
चीनची १९४९ पासून जखम भळभळती; नौदलाचा अजस्त्र विकास केवळ तैवानमुळेच By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 3:28 PM1 / 11चीनने तैवान ताब्यात घेण्याच्या मनसुब्याने चीनच्या सैन्याने मोठा युद्धाभ्यास सुरु केला आहे. हा युद्धाभ्यास तब्बल ७० दिवसांचा असून समुद्राचा एक मोठा हिस्सा चीनने बंद करून टाकला आहे. आज तैवानच्या महिला राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी विक्रमी मताधिक्याने दुसऱ्यांदा पदग्रहन केले आहे. यावेळी त्यांनी चीनला चांगलेच सुनावले आहे. तैवान आणि चीनमधील तणावाच्या संबंधांचा इतिहास जाणून घेऊयात.2 / 11चीन तैवानला आपला भाग असल्याचे सांगत आहे. तर तैवान स्वतंत्र देश असल्याचे मानत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानला एक देश, दोन सरकारे बनविण्याची ऑफर ठेवलेली आहे. यावर आज तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी चीनचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. 3 / 11याउलट वेन यांनी जिनपिंग यांच्यासमोर दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या अस्तित्वावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 4 / 11तैपेईमध्ये दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीवेळी एका परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ वर्षांच्या वेन यांनी सांगितले की, चीनसोबत चर्चा करायला तयार आहे. मात्र, एक देश-दोन सरकारे या मुद्द्यावर कदापी नाही. 5 / 11चीन आणि तैवानचे संबंध ऐतिहासिक वळणावर पोहोचले आहेत. यामुळे दोन्ही देशांचे कर्तव्य आहे की, दीर्घकालीन दोघांच्याही अस्तित्वाचा रस्ता शोधावा. तसेच दुष्मनी किंवा मतभेदांना रोखावे. मला विश्वास आहे की चीनचे नेतृत्व यावर विचार करेल आणि जबाबदारीने वागेल. 6 / 11चीनने त्साई यांच्या पहिल्या कार्यकाळात तैवानसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. तसेच चीनी सरकारने तैवानवर सैन्य कारवाई करण्याचीही धमकी दिली होती. यामुळे गेल्या आठवड्यापासून चीनने तैवानच्या समुद्रासारखी परिस्थिती असलेल्या समुद्रामध्ये युद्ध सराव सुरु केला आहे. 7 / 11त्साई यांनी चीन आणि तैवानमधील संबंधांमध्ये शांती, समानता, लोकशाही आणि चर्चेचे समर्थन केले. तसेच हाँगकाँगसारखे एक देश, दोन सरकारे याला विरोध असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी देशामध्ये ५ जी, जैव उद्योग, उपचार, संरक्षण आणि नूतन उर्जासह अन्य मुख्य उद्योगधंद्यांच्या निर्मितीसाठी आश्वासन दिले आहे. 8 / 111949 मध्ये माओत्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पार्टीने चियांग काई शेक यांच्या नेतृत्वाखालील कॉमिंगतांग सरकार उलथवून टाकले होते. यानंतर चियांग काई शेक यांनी तैवान बेटावर जाऊन आपले सरकार बनविले होते. 9 / 11या काळात कम्युनिस्ट पक्षाकडे म्हणजेच चीनकडे मजबूत नौदल नव्हते. यामुळे त्यांना समुद्र पार करून जाता आले नाही. तेव्हापासून तैवान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानत आला आहे. 10 / 11चीनने हे मनाला लावून घेतले आणि तेव्हापासून नौदलाला ताकदवर बनविण्याकडे लक्ष दिले. तैवानला चीन आजही अभिन्न अंग मानत आला आहे. मात्र, तैवानकडे त्यांचे स्वत:चे सैन्य आहे. ज्याला अमेरिकेची संमती आहे. 11 / 11जेव्हापासून तैवानमध्ये डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष सत्तेत आला आहे तेव्हापासून चीनसोबतचे संबंध बिघडले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications