China has made a copy of these historical monuments around the world
जगभरातील या ऐतिहासिक वास्तूंची चीनने केली आहे सेम टू सेम कॉपी By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 3:37 PM1 / 9गेल्या काही वर्षांत चीनने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अगदी छोट्या यंत्रांपासून मोबाईल, विमाने, शस्त्रास्रे अशा विविध वस्तूंच्या निर्मितीत चीनने आघाडी घेतली आहे. एवढेच नव्हे तर आता जगभरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंची सेम टू सेम कॉपी करण्याचीही किमया साधली आहे. अशाच काही वास्तूंचा घेतलेला हा आढावा. 2 / 9आयफेल टॉवर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर फ्रान्सची राजधानी पॅरिस येते. मात्र चीनने हांगचोऊ शहरात खऱ्या आयफेल टॉवरची प्रतिकृती उभी केली आहे.3 / 9पिरॅमिड ही इजिप्तची ओळख. मात्र चीनने हुबेई प्रांतात अगदी खरेखुरे भासतील असे पिरॅमिड उभे केले आहेत. 4 / 9कॅपिटल हिल अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये स्थित आहे. मात्र चीनने गुआंगदोंग प्रांतात कॅपिटल हिलची जशास तशी प्रतिकृती उभी केली आहे. 5 / 9लंडन ब्रिज ही इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनची खास ओळख. मात्र चीनने सुचोऊ शहरात नदीवर याची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. 6 / 9हे छायाचित्र पाहिल्यानंतर कुणीही हे पॅरिसमधील लुव्रे म्युझियम आहे, असे सांगेल. मात्र आर्किटेक्ट आय. एम. पेई याने शेनचॅन प्रांतात लुव्रे म्युझियमची ही प्रतिकृती साकारली आहे. 7 / 9व्हाइट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान. चीनने याचीही प्रतिकृती साकारली आहे. हे व्हाइट हाऊस एका अमेरिकन रियल इस्टेट कंपनीचे कार्यालय आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात. 8 / 9पार्थेनन या ग्रीसमधील प्राचीन भव्य मंदिराची प्रतिकृतीही चीनमध्ये साकारली गेली आहे. गांसू प्रांतातील चानचोऊ येथे हे मंदिर उभे केले गेले आहे. 9 / 9जागतिक वारसा घोषित केल्या गेलेल्या ऑस्ट्रियामधील हालस्टाट या गावाची प्रतिकृतीही चीनने उभी केली आहे. गुआंगडोंग प्रांतात चीनकडून हे गाव उभे केले गेले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications