शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीननं एका वर्षात 60 अण्वस्त्रं वाढवले! जगात सर्वाधिक अणुबॉम्ब कुणाकडे? जाणून घ्या भारत-पाकिस्तानची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:43 PM

1 / 8
भारताचा शेजारी चीन आपल्या अण्वस्त्रांचा साठा झपाट्याने वाढवताना दिसत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (SIPRI) अहवालानुसार चीनने गेल्या वर्षभरात तब्बल 60 अण्वस्त्रे वाढविली आहेत. या बाबतीत चीन रशिया, भारत आणि पाकिस्तानपेक्षा बराच पुढे आहे.
2 / 8
थिंक टँकच्या अहवालानुसार, सध्या जगभरात एकूण 12,512 एवढी अण्वस्त्रे आहेत. एवढेच नाही तर, जगात पुन्हा एकदा अण्वस्त्रे जमवण्याचा ट्रेंड वाढत आहे. सध्या संपूर्ण जग हे मानवी इतिहासातील सर्वाधिक धोक्याच्या टप्प्यावर उभे आहे, असे ही या अहवालात म्हणण्यात आले आहे.
3 / 8
SIPRI च्या अहवालानुसार, जगभरातील अनेक देशांचे आंतरराष्ट्रीय संबंध बिघडत असतानाच, अण्वस्त्रांची संख्या वाढली आहे. जगभरात अंदाजे 12,512 एवढे अणुबॉम्ब आहेत. यांपैकी 86 या वर्षात तयार झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, एकूण अण्वस्त्रांपैकी तब्बल 9,576 संभाव्य वापरासाठी तयार आहेत.
4 / 8
अण्वस्त्र तयार करण्यात चीन सर्वात पुढे - गेल्या 1 वर्षात अण्वस्त्र तयार करण्याच्या बाबतीत चीन सर्वात पुढे आहे. यच बरोबर, चीन शिवाय, रशिया, भारत, पाकिस्तान आणि नॉर्थ कोरियानेही आपल्या अण्वस्त्रांच्या खजिन्यात वाढ केली आहे.
5 / 8
चीनने एका वर्षात तयार केले 60 अण्वस्त्र - चीनने या वर्षात 60 अण्वस्त्र तयार केली. तर रशियाने 12, पाकिस्तानने 5, नॉर्थ कोरियाने 5 आणि भारताने 4 अण्वस्त्रे तयार केली आहेत.
6 / 8
रशिया आणि अमेरिकेकडे 90% अण्वस्त्रं - रशिया आणि अमेरिकेकडे जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी तब्बल 90% अण्वस्त्रं आहेत. SIPRI च्या अहवालानुसार रशियाकडे सर्वाधिक 4489 अण्वस्त्रे आहेत. या यादीत दुसरा क्रमांक लागतो अमेरिकेचा. अमेरिकेकडे 3708 अण्वस्त्रे आहेत. यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनकडे 410 अण्वस्त्र आहेत या पाठोपाठ फ्रान्स (290) आणि ब्रिटन (225) यांचा क्रमांक लागतो.
7 / 8
थिंक टँकच्या मते, अमेरिका आणि रशियाने जवळपास 2,000 अण्वस्त्रे हाय अलर्टवर ठेवली आहेत. अर्थात ही अस्त्रे मिसाइल्समध्य फीट आहेत अथवा एअरबेसवर तैनात आहेत.
8 / 8
भारत - पाकिस्तानची स्थिती अशी - अहवालानुसार, अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तान भारताच्या तुलनेत पुढे आहे. पाकिस्तानकडे 170 अण्वस्ते आहेत. तर भारताकडे 164 अण्वस्त्रे आहेत. तसेच नॉर्थ कोरियाकडे 30 अण्वस्ते आहेत.
टॅग्स :chinaचीनnuclear warअणुयुद्धAmericaअमेरिकाrussiaरशियाIndiaभारतPakistanपाकिस्तान