china new daxing international airport in beijing
चीनमधील नवीन डेक्सिंग एयरपोर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:11 PM1 / 7इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये चीनने आघाडी घेतली आहे. हायस्पीड ट्रेनचं नेटवर्क असो अथवा लांब रस्त्यांचे जाळे. सध्या चीनमधील अत्याधुनिक डेक्सिंग एअरपोर्ट चर्चेत आहे. 2 / 7चीनमधील बिजींगमध्ये डेक्सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. यासाठी साडे अकरा अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करण्यात आला आहे. 3 / 7यंदाच्या शेवटच्या वर्षापर्यंत जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी चीनमधील हे विमानतळ असल्याचे नोंदविण्यात येईल. 4 / 72021 पर्यंत याठिकाणी वर्षाला 4.5 कोटी प्रवासी आणि 2025 पर्यंत वर्षाला 7.2 कोटी प्रवाशांचे ये-जा होण्याची शक्यता आहे. 5 / 7या विमानतळाच्या उभारणीचे काम 2015 मध्ये सुरु झाले होते. गेल्या तीन वर्षात या मोठ्या विमानतळाची निर्मिती करण्यात आली. टर्मिनट बिल्डिंगचे डिझाइन ब्रिटिश-इराकी आर्किटेक्ट जाहा हदीद यांनी तयार केला होता. 6 / 7गेल्या काही दिवसांपूर्वी या विमानतळाचे ट्रायल घेण्यात आले होते. चायना साउदर्न एअरलायन्स, चायना ईस्टर्न एअरलायन्स, एअर चायना आणि शियामेन एअरलायन्सच्या प्रमुख बोईंग आणि एअरबस विमानांनी उड्डाण घेतले आहे. 7 / 7गेल्या काही दिवसांपूर्वी या विमानतळाचे ट्रायल घेण्यात आले होते. चायना साउदर्न एअरलायन्स, चायना ईस्टर्न एअरलायन्स, एअर चायना आणि शियामेन एअरलायन्सच्या प्रमुख बोईंग आणि एअरबस विमानांनी उड्डाण घेतले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications