आम्ही लग्नाळू! चिनी शाळा आता विद्यार्थ्यांना देणार रोमान्सचे धडे अन् सांगणार लग्नाचे फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 2:18 PM
1 / 7 चीनमधील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात रोमान्सचा धडा असणार आहे. याशिवाय, शिक्षक विद्यार्थ्यांना लग्न करण्याचे फायदे समजावून सांगणार आहेत. 2 / 7 चीनमध्ये दरवर्षी लोक मोठ्या संख्येनं एका आठवड्यासाठी Two Sessions नावाच्या संमेलनात एकत्र येतात. या संमेलनात चीनी संस्कृतीची मूल्य, सामाजिक मूल्य आणि देशातील सेलिब्रिटींबाबत येथे चर्चा करतात. चर्चेतून देशाच्या सामाजिक योजनांमध्ये बदल करण्यासाठीचे सल्ले सुचवले जातात. 3 / 7 चीनमध्ये यंदाही या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यातून एक लक्षवेधून घेणारा सल्ला चर्चेचा विषय ठरला आहे. या संमेलनात महिलांसाठीच्या भूमिकेबाबतचा एक विषय चर्चेचं केंद्रस्थान बनला. 4 / 7 चीनमध्ये महिलांना केवळ चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादीत ठेवण्याचा सल्ला संमेलनात देण्यात आला. यासाठी लग्नाचं वय महिला आणि पुरूष या दोघांसाठीही कमी करून ते १८ करण्यात यावं असं सुचवलं गेलं आहे. 5 / 7 इतकंच नव्हे, तर शालेय विद्यार्थ्यांना रोमान्सचे धडे दिले जावेत आणि लग्न करण्याचे फायदे समजवले जावेत अशीही चर्चा झाली. पण यावरुन सोशल मीडियात चीनी महिलांनी आपला जोरदार रोष व्यक्त केला आहे. 6 / 7 मुलींनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तातडीनं त्यांचं लग्न लावून देण्याचा सरकारचा कट आहे, असा आरोप चीनी महिलांनी केला आहे. 7 / 7 गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या सुटीच्या कालावधीत वाढ करण्यावरही चर्चा झाली. याशिवाय, कुटुंब नियोजन योजनेतंही सूट देण्याची विचार चीन करत आहे. पण असं करून महिला या केवळ मुलांना जन्म घालण्यासाठीच आहेत आणि त्यांना त्यापुरतंच मर्यादित ठेवण्याचा कट शिजत आहे, असा दावा चीनी महिलांनी केला आहे. आणखी वाचा