शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 12:23 PM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि चीन भारताविरोधात कुरघोडी करत आहेत. दोन्ही भारताचे शेजारील देश भारताला कसा त्रास देता येईल, याचा पुरेपूर विचार करत असतात. (फोटोः एएफपी)
2 / 10
आता चीन आणि पाकिस्तान त्यांच्या आर्थिक कॉरिडॉरसाठी हजारो कोटींचा रेल्वे प्रकल्प सुरू करत आहेत. या प्रकल्पाचा उगम अशा क्षेत्रातून झाला आहे, ज्याबद्दल भारत, चीन आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहेत.(फोटोः शिन्हुआ)
3 / 10
दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे 6.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 50,980 कोटी रुपयांचा रेल्वे प्रकल्प सुरू करीत आहेत. (फोटोः गेटी)
4 / 10
या व्यतिरिक्त बीजिंग आणि इस्लामाबाद यांनी मिळून थाकोट ते हवेलियांपर्यंत 118 किमी लांबीचा रस्ता तयार केला आहे. हा मुख्य रस्ता प्रकल्पाचा एक छोटासा भाग आहे.(फोटोः गेटी)
5 / 10
हा रस्ता पाकिस्तानमधील इस्लामाबाद ते चीनच्या झिनजियांग भागातील काश्गरपर्यंत जाणारा आहे. हा नवीन रस्ता जम्मू काश्मीरला लागून असलेल्या वादग्रस्त भागातून सुरू होईल. हा रस्ता पूर्ण झाल्यावर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जम्मू-काश्मीरच्या बर्‍याच भागावर थेट नजर ठेवता येणं शक्य होणार आहे. (फोटोः गेटी)
6 / 10
इस्लामाबाद ते काश्गरकडे जाणा-या या महामार्गाचे नाव फ्रेंडशिप हायवे आहे. या महामार्गामुळे पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश केवळ भारतातील अनेक सामरिक भागांवर फक्त नजरच ठेवू शकणार नाहीत, तर परस्पर वाहतुकीचा मार्गही खुला करू शकतील. (फोटोः गेटी)
7 / 10
शांघाय म्युनिसिपल सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे तज्ज्ञ वांग देहुआ म्हणाले की, पाकिस्तान आणि चीनच्या या वाहतूक प्रकल्पांमुळे भारतात काही प्रमाणात अस्वस्थता आहे. (फोटोः गेटी)
8 / 10
वांग यांचे म्हणणे आहे की, या अस्वस्थतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतातील रणनीतिक क्षेत्रे ज्याला या महामार्गावर सहजपणे धक्का बसू शकतो.(फोटोः गेटी)
9 / 10
वांग म्हणाले की, पूर्वीचे काश्मीर हा तिन्ही देशांमधील प्रश्न नव्हता. पूर्वी हा मुद्दा फक्त भारत आणि पाकिस्तानचा होता. पण आता भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्यात हा मोठा मुद्दा बनला आहे. लडाखवर चीनच्या दाव्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. (फोटोः गेटी)
10 / 10
भारताचे चीनशीही संबंध तणावपूर्ण आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने जम्मू-काश्मीरचे दोन भागात विभाजन केले होते. उत्तर भाग लडाख राज्य बनला आणि दक्षिणेकडील भाग जम्मू-काश्मीर तयार करण्यात आला. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही धक्का बसला. कारण दोघेही या दोन राज्यांच्या भागांवर आपला दावा सांगत असतात. या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या देशाचा नवीन नकाशा जाहीर केला. ज्यात जम्मू-काश्मीरवर भारताने बेकायदेशीरपणे कब्जा केला असल्याचे दाखविण्यात आले. त्याचबरोबर भारत सरकारने पाकिस्तानचा हा नकाशा नाकारला आहे.(फोटोः गेटी)
टॅग्स :chinaचीनIndiaभारतindia china faceoffभारत-चीन तणाव