शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संपूर्ण जगाची हेरगिरी करण्यासाठी चीनने आखला खतरनाक प्लॅन, अंतराळात १३ हजार सॅटेलाईट्सच्या मदतीने बनवतोय मेगाकॉन्स्टेलेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 8:25 PM

1 / 6
गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने बलाढ्य होच चाललेला चीन जगासाठी डोकेदुखी बनत चालला आहे. दरम्यान, चीनने आता जगभरात हेरगिरीमुळे चिंता वाढवली आहे. चीनने पृथ्लीच्या खालच्या कक्षेत १३ हजार सॅटेलाईट्सच्या माध्यमातून मेगाकॉन्स्टेलेशन तयार करण्याची योजना आखली आहे. हे नेटवर्क चिनी ५जी मोबाईल इंटरनेटचा विस्तार करण्याचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. ५जीसाठी काही कंपन्यांना चोंगकिंग शहरामध्ये काम सुरू करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
2 / 6
तर या नेटवर्कच्या माध्यमातून काय पाहिले जाईल, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्याशिवाय हे कसे काम करेल, याबाबतही माहिती मिळालेली नाही. मात्र याचे लक्ष्य कम्युनिकेशन आणि ग्रामीण भागांची आवश्यकता पूर्ण करणे हे ठेवण्यात आले आहे. सध्या चीनच्या या प्लॅनमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे.
3 / 6
चीनकडून स्पेसमध्ये उचललेले कुठलेही पाऊल हे संरक्षण तज्ज्ञांमध्ये चिंता निर्माण करते. एक इंटरनेट असलेल्या सॅटेलाईटच्या समुहाचे असले चीन सरकारसाठी एक उच्च पातळीवरील योजना मानले जात आहे. त्यामधून केवळ चीनमध्येच नाही तर जगभरात दुरसंचार सेवा दिली जाऊ शकेल. त्यामाध्यमातून चीन पश्चिमी देशांमधील ऑपरेटर्सना मागे टाकणार आहे.
4 / 6
एक मेगाकॉन्स्टेलेशन शेकड्यांपासून हजारो सॅटेलाईट्सपासून बनलेले असते. ते पृथ्वीच्या सर्व भागांना कव्हर करण्याचे काम एकाचवेळी करते. हे सॅटेलाईट इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासाठी पृथ्वीपासून काही शे मैल वर कार्यरत असतात.
5 / 6
सद्यस्थितीत चीन आणि पाश्चात्य देशांचे संबंध थंडावलेले आहेत. त्याच्यामागचं मुख्य कारण हे कोरोनाची साथ आहे. अशा परिस्थितीत व्यापक पातळीवर सॅटेलाईट लाँच करणे भीती निर्माण करणारे आहे. कारण त्याचा वापर अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात हेरगिरीसाठी केला जाऊ शकतो.
6 / 6
चीनच्या या नव्या योजनेंतर्गत चोंगकिंगमध्ये एक नवीन कम्युनिकेशन बेस तयार केला जाईल. ज्या कंपन्यांनी चोंगकिंगमध्ये सॅटेलाईट केंद्र बनवण्याचा ठेका घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, शहरातील कार्यबल आणि अर्थव्यवस्थेसह अनेक रणनीतिक लाभ मिळवून देते.
टॅग्स :chinaचीनPoliticsराजकारणInternationalआंतरराष्ट्रीय