China Power Crisis: Huge shortage of electricity; Apple, Tesla stopped production
China Power Crisis: चीनमध्ये बत्ती गुल! विजेची प्रचंड टंचाई; Apple, Tesla चे उत्पादन थांबले By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:30 AM1 / 9China Power Crisis: इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने बनविण्याचा हब बनलेल्या चीनमध्ये हाहाकार उडाला आहे. चीनमध्ये विजेची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने कंपन्या बंद ठेवाव्या लागत आहेत. तसेच नागरिकांना विजेची उपकरणे वापरू नयेत असे आदेश काढण्यात आले आहेत. 2 / 9चीनच्या अनेक प्रांतांमध्ये वीज टंचाई जाणवत आहे. यामुळे कंपन्यांना उत्पादन कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Power crisis affect on companies) यामुळे मोठमोठ्या कंपन्यांना याचा फटका बसला असून त्यांचे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बाजारात टंचाई देखील निर्माण होऊ शकते. 3 / 9अॅपल आणि टेस्लासारख्या दिग्गज कंपन्यांना वीज टंचाईच्या समस्येमुळे उत्पादन कमी करावे लागले आहे. महत्वाचे म्हणजे आयफोन 13 सीरीज नुकतीच लाँच झाली आहे. यामुळे अॅपलला आयफोनचे उत्पादन वाढवायचे आहे. मात्र, कंपन्यांना काही प्लाँटमधील उत्पादन थांबवावे लागले आहे. 4 / 9जवळपास 15 चिनी कंपन्यांनी सांगितले की, पावर कटमुळे त्यांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. तर 30 हून अधिक तैवान कंपन्यांनी देखील पावर कटमुळे काम बंद केल्याचे म्हटले आहे. 5 / 9इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरात चीन अग्रेसर आहे. वीजेवर चालणाऱ्या गाड्याही जगाच्या 90 टक्के आहेत. यामुळे वीजेचा वापर अधिक असताना आता कोरोना नंतर मागणी वाढल्याने कंपन्यांनी उत्पादन देखील वाढविल्याने सर्वत्र विजेची टंचाई निर्माण झाली आहे.6 / 9चीनमध्ये ऑगस्टमध्ये गेल्या वर्षी जेवढे उत्पादन झाले त्याच्या तुलनेत 10.1 टक्के यंदा अधिक वीज उत्पादित करण्यात आली. 2019 पेक्षा हा आकडा 15 टक्के अधिक होता. तरीदेखील वीजेची टंचाई जाणवू लागल्याने कंपन्यांवर मोठे संकट कोसळले आहे. 7 / 9औद्योगिक उत्पादन वाढण्याबरोबरच कोळशाची टंचाई देखील जाणवत आहे. चीनमध्ये कोळशावरून अधिकांश वीजनिर्मिती केली जाते. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या वादामुळे चीनने कोळशाची आयात कमी केली आहे. तसेच स्थानिक कोळशाच्या खाणींमधूनही कमी उत्पादन घेतले जात आहे. 8 / 9जगभरात नॅचरल गॅसच्या कमतरतेमुळेदेखील चीनमध्ये विजेचे संकट वाढले आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे चीन ही गरज पूर्ण करण्यास असमर्थ ठरू लागला आहे. चीनच जगभरात सर्वाधिक प्रदूषण करणारा देश आहे. 9 / 9शी जिनपिंग यांना चीनमधील कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन 2030 पर्यंत 65 टक्क्यांनी घटवायचे आहे. यामुळे कोळशाचा वापर देखील कमी करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications