china prepares for attack on taiwan every day sending fighter jet
धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 1:52 PM1 / 10दक्षिण चीन सागरात अमेरिकन नौदलाच्या युद्ध सरावाकडे दुर्लक्ष करत, धोकेबाज चीन तैवानवर कब्जा करण्याच्या तयारीला लागला आहे. एवढेच नाही, तर चीन साधारणपणे रोजच तैवानच्या सीमेत आपली लढाऊ विमानं पाठवत आहे, असे तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू म्हणाले.2 / 10चीन करतोय हल्ल्याचा सराव - वू म्हणाले, चीन ताकदीच्या जोरावर तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच तो तैवानवर हल्ला करण्याचा अभ्यास करत आहे. एवढेवच नाही, तर चीन रोज आमच्या हवाई हद्दीत लढाऊ विमानं पाठवत आहे. हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे.3 / 10सातत्याने वाढतोय धोका - तैवानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, चीन आमच्या हवाई हद्दीत आणि समुद्रात हळू-हळू आपली सैन्य शक्ती वाढवत आहे. चीन सैन्य तागदीच्या जोरावर तैवानवर कब्जा करण्याच्या तयारीत आहे. आता धोका सातत्याने वाढतच चालला आहे.4 / 10चीनने म्हटले आहे, की आमचा देश सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे. हे दर्शवणे हाच अशा प्रकारच्या युद्धाभ्यासाचा हेतू आहे. 5 / 10चीनने दिली हल्ल्याची धमकी - चीनचे म्हणणे आहे, की तैवान त्यांच्या भाग आहे आणि त्यावर नियंत्रणासाठी त्यांनी हल्ल्याचीही धमकीही दिली आहे.6 / 10तैवानमध्ये पळून गेले होते राष्ट्रवादी नेते - चीनमधील कम्युनिस्ट पक्षासोबत 1949 मध्ये झालेल्या गृहयुद्धानंतर राष्ट्रवादी नेते चियां काई-शेक हे तैवानमध्ये पळून गेले होते. 7 / 10तैवान जापानची वसाहत होता - तैवान जापानची वसाहत राहिला आहे. यानंतर माओच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्षाने चीनवर नियंत्रण मिळवले.8 / 10चीनने तैवानशी संबंध तोडले - चीनमधील शी जिनपिंग सरकारने 2016 मध्ये त्साई इंग वेन या राष्ट्रपती झाल्यानतंर तैवानबरोबर असलेले संबंध तोडले आहेत. 9 / 10चीन तैवानला जाकतिक पातळीवर राजकीय दृष्ट्या एकाकी पाडण्याचाही प्रयत्न करत आहे आणि हल्ल्याचीही धमकी देत आहे10 / 10हाँगकाँगनंतर तैवानवर डोळा - हाँगकाँगवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर आता चीन तैवानला धमक्या देत आहे. तैवानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, जपान आणि अमेरिके सारख्या सहकाऱ्यांच्या समन्वयाची आवश्यकता आहे. तैवानचे या दोघांशीही घनिष्ठ संबंध आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications